आता विप्रो उचलणार तुमच्या उच्च शिक्षणाचा खर्च. B.Sc. आणि BCA साठी विप्रो कंपनीने आणली आहे मोठी भरती. या भारती अंतर्गत उमेदवारांच्या उच्च शिक्षणाचा सोबतच त्यांना कंपनी मध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे.
Table of Contents
ToggleWipro WILP Bharti 2024
Wipro Wilp 2024, विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम परत आला आहे, आणि हे तुमचे उच्च शिक्षण घ्यायचे की तुमचे करिअर सुरू करायचे या तुमच्या दुविधेचे परिपूर्ण समाधान तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही 2023 किंवा 2024 बॅचचे B.Sc. किंवा BCA पदवीधर असल्यास, तुम्ही हा अर्ज करण्यास पात्र आहात. WILP तुम्हाला दोन्ही जगाचा उत्तम आनंद घेऊ देते, तुमची MTech ची पदवी पूर्ण करण्यासोबतच तुम्हाला अनुभवही मिळतो आणि तुमच्या उच्च शिक्षणासाठी निधीही पुरवला जातो.
urgent jobs near me
या भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा. या लेखामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती विस्तृत स्वरूपात वाचायला मिळेल.
Wipro Wilp म्हणजे काय?: What is Wipro Wilp
Wilp चा फुल फॉर्म Work Integrated Learning Program असा होतो. हा Wipro कंपनी चा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये तुम्हाला उच्च शिक्षणासोबत कंपनी मध्ये कामाचा अनुभव देखील मिळतो.
Wipro WILP Bharti 2024 Overview
Organization | Wipro WIlp |
---|---|
Post | Scholar Trainee |
Age limit | min 18 years |
Application Process | Online |
Last Date | 30 August |
Education Qualification | B. Sc. / BCA Graduate |
Form Fee | No Fee |
Official Website | Wipro WIlp |
तुमच्या करिअर ला चालना देण्यासाठी पहिला उत्तम पर्याय कोणता असेल तर तो उच्च शिक्षणाचा. परंतु याचा अर्थ मोठी गुंतवणूक किंवा खर्च होईल. त्यानंतर तुम्हाला नोकरी मिळेल.परंतु भविष्याचे काय? त्यासाठी उपाय सोपा आहे. विप्रो कंपनी चा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम 2024, ज्यामध्ये BCA आणि B.Sc. झालेल्या विद्यार्थ्यांना हे सर्व करण्याची संधी मिळते. प्रीमियर युनिव्हर्सिटीमधून MTech पदवी घेत असताना विप्रोमध्ये काम करण्यास सुरुवात करा. आता विप्रो उचलणार तुमचा तुमच्या उच्च शिक्षणाचा खर्च.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “Wipro“ च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Wipro WILP Bharti 2024 Official Link:
या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही विप्रो विल्प च्या अधिकृत वेबसाईट वर या पदाची जाहिरात पाहू शकता.
Wipro WILP Bharti 2024: Official Link
Wipro WILP Bharti 2024 Education Qualification
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिले आहेत.
- या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी आणि 12 वी पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवार B.Sc. किंवा BCA चा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांची B.Sc. “Computer Science, Information Technology, Mathematics, Statistics, Electronics, and Physics” यांपैकी कोणत्याही विषयांतून झालेली असावी.
- उमेदवाराची पदवी 2023 किंवा 2024 या वर्षांमध्ये झालेली असावी.
- त्याचप्रमाणे पदवी परीक्षेमध्ये 60 % गुण किंवा 6.0 CGPA किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?
Wipro WILP Bharti 2024 Eligibility Criteria
विप्रो च्या होणाऱ्या या भरतीसाठी असणाऱ्या पात्रतेच्या अटी खाली दिल्या आहेत.
- Distance Education: यामध्ये फक्त 10 वी आणि 12 वी साठी distance education ची सूट आहे.
- भरतीची ऑनलाईन परीक्षा होताना जर तुमचा फक्त एकाच चालू बॅकलॉग असेल तर तुम्हाला परीक्षेला बसता येईल.
- उमेदवारांना त्यांचे सर्व बॅकलॉग 6 व्या सेमिस्टर मध्ये क्लिअर करायचे आहेत.
- ग्रॅज्युएशन दरम्यान core mathematics हा विषय असणे अनिवार्य आहे.
- Business Maths आणि Applied Maths ग्रॅज्युएशनमध्ये core mathematics म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- शिक्षणात जास्तीत जास्त 3 वर्षे GAP ची सवलत देण्यात आली आहे. (10वी ते पदवी शिक्षण सुरू होण्याच्या दरम्यान)
- पदवीमध्ये कोणत्याही GAP ला परवानगी नाही. पदवी सुरू झाल्यापासून ३ वर्षांच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा भारतीय नागरिक असावा किंवा इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट धारण केल्यास त्याच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असावे.
- भूतान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- नोंदणीच्या वेळी उमेदवाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
Trainee Agreement:
- कंपनी मध्ये रुजू होताना 60 महिन्यांसाठी चा प्रशिक्षण करार करणे आवश्यक आहे.
Note: जर तुम्हाला 5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर कंपनी सोडायची असेल तर तुम्हाला ₹ 75,000 इतकी रक्कम भरावी लागेल.
Wipro WILP Bharti 2024 Selection Process
Wipro WILP Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया सोपी आहे. खाली निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहिती दिली आहे.निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे.
- Round 1 – Online Assessment
- प्रत्येक पात्र उमेदवाराची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे.
- यामध्ये 80 मिनिटांचा वेळ मिळणार आहे ज्यामध्ये 4 सेकशन्स असणार आहेत.
- Verbal- 20 mins- 20 questions
- Analytical-20 mins-20 questions
- Quantitative – 20 Mins – 20 questions
- Written Communication Test (20 mins)
- Round 2 – Business discussion
- Round 3 – HR Discussion
ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना कळवण्यात येईल.
Wipro WILP Bharti 2024 Application Process
- सर्व पात्र उमेदवारांना या भरती साठीचा अर्ज 30 ऑगस्ट पूर्वी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
Wipro WILP Bharti 2024: Apply here…
Wipro WILP Bharti 2024 Salary
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना खाली दिल्याप्रमाणे भत्ता (stipend) मिळणार आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना ₹ 75,000 इतका जॉइनिंग बोनस देखील मिळणार आहे. हा बोनस पहिल्या महिन्याच्या stipend सोबत मिळेल.
- 1st Year: stipend ₹ 15,000 + 488 (ESI) + Joining Bonus of ₹ 75,000
- 2nd Year: stipend ₹ 17,000 + 533 (ESI)
- 3rd Year: stipend of ₹ 19,000 + 618 (ESI)
- 4th Year: stipend of ₹ 23,000
अशाच भरतीच्या जाहिरातींसाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा.