Use of AI in Soyabean Production: सोयाबीन उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा वापर

Use of AI in Soyabean Production
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Use of AI in Soyabean Production:

2025 मध्ये AI तंत्रज्ञान तर सर्वांनाच माहिती आहे. AI दिवसेंदिवस आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चाललाय. आपण दैनंदिन वापरामध्ये AI अनेक कामांसाठी वापरतो पण तुम्ही कधी असा विचार केलाय का कि AI तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरले तर? AI तंत्रज्ञान जर शेतीमध्ये वापरले तर शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होऊ शकतो पण तो कसा? 

सोयाबीन उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा वापर

अलीकडेच धाराशिव मध्ये सोयाबीन चे उत्पादन घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. Tv9 मराठी च्या बातमी नुसार सोयाबीन उत्पादनात AI  तंत्रज्ञानाचा वापर करणारा देशातील पहिला प्रकल्प हा धाराशिव मध्ये राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सोयाबीन पिकासाठी धाराशिव जिल्हातील उपळा गावामध्ये हा प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक तासाला हवामान आणि शेतीविषयक माहिती दिली जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे उत्पादन नेमके कसे वाढणार ते आपण पुढे पाहू. 

हा प्रकल्प नेमका काय आहे?

यामध्ये वेदर स्टेशन शेतकऱ्यांना हेल्प करत आहे. वेदर स्टेशनच्या माध्यमातून चोहूबाजूला पसरलेल्या 20 किलोमीटर परिसरातील शेतीच्या नियोजनासाठी मार्गदर्शन केले जात आहे. वेदर स्टेशनच्या माध्यमातून वातावरणातील बदलाचा रिपोर्ट प्रत्येक तासाला राहुल कृषी विद्यापीठाला पाठवला जात आहे. हा रिपोर्ट कृषी विद्यापीठातला प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठातील तज्ञ नोंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन कसे करायचे हे थेट मोबाईलवर सांगतात अशी माहिती कृषी अधिक्षक महादेव आसलकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा …

NMMC Medical Officer Bharti 2025: How to Apply?

वेदर स्टेशनच्या जोडीला सॉईल सेन्सर तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे. उपळा गावातील वेगवेगळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये दहा शेतकऱ्यांच्या शेतात या प्रकारचे सॉईल सेन्सर बसवण्यात आले आहेत. अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी राकेश माकोडे यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

पिकावर पडणाऱ्या रोगाची माहिती अगोदरच मिळणार 

पिकाला होणारा पाण्याचा ताण आणि ओलावा व त्यामुळे होणारे बुरशीजन्य रोग याविषयीची सर्व माहिती अगोदरच हे सॉईल सेन्सर शेतकऱ्यांना पुरवतील. त्यामुळे पिकावर येणारी रोग राहील चार दिवस अगोदरच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना समजण्यास मदत होईल. त्यामुळे रोग पसरण्या अगोदरच त्याचे निदान करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मदत होईल. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कीड नियंत्रणाची फवारणी कधी करावी या संदर्भातील माहिती देखील यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आहे. टीव्ही नाईन मराठी च्या बातमीनुसार उपळा गाव येथील शेतकरी धनाजी पडवळ यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील उपळा गावांमधील या प्रकल्पाचे संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे. या प्रयोगामध्ये शेतीतील बारीक-सारी सर्व गोष्टींची नोंद होत आहे त्याचप्रमाणे प्रत्येक क्षणाची डिजिटल रेकॉर्ड ठेवली जाणार आहेत. उपळा गावातील हा प्रकल्प फक्त एका गावासाठीच नव्हे तर देशाच्या कृषी क्षेत्रासाठी त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा बदल घडवणार आहे. या प्रकल्पामुळे शेतीतील सुधारणा करण्यासाठी गती मिळणार आहे.

आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा खूप फायदा होईल असे सांगण्यात येत आहे. या प्रयोगाच्या यशस्वी चाचणीनंतर देशातील अनेक भागात शेतीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.