Table of Contents
ToggleAadhar card वर SIM कार्ड तपासणी कशी कराल? जाणून घ्या सोप्या स्टेप्समध्ये!
नमस्कार मित्रांनो!, आजच्या लेखात आपण एक महत्त्वाचा आणि उपयोगी विषय पाहणार आहोत, आधार कार्डवर SIM कार्ड तपासणी घरबसल्या कशी करायची. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे, कारण आधारचा वापर करून तुमच्या नावावर अनेक SIM कार्ड्स काढले गेले असण्याची शक्यता असते.
अशा परिस्थितीत दुसऱ्या व्यक्तीने तुमच्या नावाचा वापर करून SIM कार्ड घेतलं असेल, तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणूनच, “आधार कार्डवर SIM कार्ड तपासणी” ही प्रक्रिया वेळोवेळी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.सरकारने यासाठी एक अधिकृत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही ही तपासणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. चला तर मग, ही प्रक्रिया काय आहे ते पाहूया.
सायबर फ्रॉड वाढतोय – सावध राहा!
आजकाल मोबाईल वापरणं आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालाय, पण याचं एक दुसरं रूप म्हणजे सायबर फ्रॉड. तुम्हालाही कधी कधी अनोळखी नंबरवरून फोन आले असतील, बँकेचं काम, KYC अपडेट, किंवा लॉटरी जिंकल्याचं सांगणारे फोन! हे अनेकदा फसवणुकीसाठी असतात.
असं का होतं? कारण, फसवणूक करणारे लोकं दुसऱ्यांच्या नावावर SIM कार्ड घेतात आणि त्याचा गैरवापर करतात.
खरं सांगायचं तर, अनेक लोकांना माहितीच नसतं की त्यांच्या नावावर अजून काही सिम कार्ड्स चालू आहेत. आणि उद्या जर त्या सिमचा गैरवापर झाला, तर अडचण आपल्या गळ्यात येते!
म्हणूनच, आपल्या नावावर नक्की किती सिम कार्ड्स रजिस्टर आहेत हे तपासणं खूप गरजेचं आहे.
सरकारने सुरू केलेलं Sanchar Saathi पोर्टल म्हणजे काय?
भारत सरकारने यासाठी Sanchar Saathi नावाचं एक पोर्टल सुरू केलं आहे. याच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या, अगदी काही मिनिटांत, तुमच्या आधारशी लिंक असलेले सिम कार्ड्स तपासू शकता. Sanchar Saathi हे सरकारचं एक अधिकृत पोर्टल आहे, ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधारशी लिंक असलेले SIM कार्ड्स तपासू शकता. हे सर्वांसाठी मोफत आहे आणि वापरणं खूपच सोपं आहे.
या पोर्टलवरून तुम्ही हे देखील पाहू शकता की तुमच्या नावावर कोणता सिम चालू आहे आणि तुम्ही तो वापरत नसाल, तर लगेच त्याचा रिपोर्ट करून तो बंदही करू शकता.
तुमच्या नावावर किती SIM कार्ड्स चालू आहेत ते कसं तपासायचं?
भारत सरकारने यासाठी एक सुरक्षित आणि सोपं Sanchar Saathi Portal सुरू केलं आहे. खाली दिलेली स्टेप्स फॉलो करून तुम्ही ही तपासणी सहज करू शकता.
Step 1: Sanchar Saathi ची अधिकृत वेबसाइट उघडा
सर्वप्रथम तुमच्या mobile किंवा laptop/pc वरील ब्राउझरवर https://sancharsaathi.gov.in ही वेबसाईट टाइप करा किंवा लिंकवर क्लिक करून पोर्टल उघडा.
ही वेबसाइट भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या (DoT) अखत्यारित आहे, त्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.

Step 2: “Know Your Mobile Connections – TAFCOP” वर क्लिक करा
वेबसाईट उघडल्यानंतर, होमपेजवर तुम्हाला “Know Your Mobile Connections – TAFCOP” हा पर्याय दिसेल.
हा पर्याय तुमच्या नावावर चालू असलेल्या सर्व मोबाईल कनेक्शन्सची यादी मिळवण्यासाठी आहे. यावर क्लिक करा.

Step 3: तुमचा मोबाईल नंबर टाका आणि “Request OTP” वर क्लिक करा
त्यानंतर आलेल्या पेजवर तुमचा सध्याचा चालू मोबाईल नंबर टाका (जो तुमच्या आधारशी लिंक आहे).मोबाईल नंबर टाकल्यानंतर “Request OTP” या बटणावर क्लिक करा.
Step 4: OTP टाकून लॉगिन करा
तुमच्या मोबाईलवर एक One Time Password (OTP) येईल. तो OTP संबंधित फील्डमध्ये टाका आणि “Validate OTP” किंवा “Login” वर क्लिक करा. हे टप्पे पूर्ण केल्यावर तुम्ही यशस्वीरित्या लॉगिन करता.
Step 5: तुमच्या नावावर असलेली सर्व SIM कार्ड्स यादी पाहा
लॉगिन केल्यानंतर, सिस्टम तुमच्या नावावर रजिस्टर असलेले सर्व मोबाईल नंबर (SIM कार्ड्स) स्क्रिनवर दाखवेल. या यादी मध्ये खालील माहिती समोर येईल:
- नंबर कोणत्या टेलिकॉम कंपनीचा आहे (जसे की Jio, Airtel, Vi, BSNL इ.)
- कोणत्या सर्कल/झोनमध्ये SIM रजिस्टर आहे
- नंबर चालू स्थितीत आहे की बंद
- रिपोर्ट करण्याचा पर्याय

अनोळखी नंबर असेल तर काय करावं?
- तुम्हाला जर यादीत काही अनोळखी नंबर दिसले, तर त्याला “Not My Number” म्हणून रिपोर्ट करा.
- जर एखादा नंबर तुम्ही पूर्वी वापरलेला पण आता बंद केलेला असेल, तर “Not Required” पर्याय निवडा.
- जे नंबर सध्या वापरत आहात, त्यासाठी “Required” हे सिलेक्ट करा.
निष्कर्ष :
तुमच्या नावावर कोणती SIM कार्ड्स चालू आहेत हे तपासणं आजच्या घडीला अत्यावश्यक आहे. ही माहिती फक्त तुमच्या सुरक्षेसाठी नाही तर भविष्यातील अडचणी टाळण्यासाठीही महत्त्वाची आहे.