Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील दुर्बल घटक त्याचप्रमाणे अपंग व्यक्ती, विधवा स्त्रिया यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Table of Contents
ToggleSanjay Gandhi Niradhar Yojana 2024:
राज्यातील दुर्बल घटक, अपंग व्यक्ती, विधवा स्त्रिया या सर्वांना आर्थिक सहाय्य आणि पदर्थबळ मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत चालवली जाणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना ही समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी एक आशेचा किरण आहे. ही योजना अशा लोकांना आर्थिक सहाय्य पुरवते ज्यांना विविध सामाजिक व आर्थिक कारणांमुळे स्वत:चे उदरनिर्वाह करणे कठीण जाते. या योजनेमुळे त्यांना आधार मिळणार आहे.
जर तुम्हाला सुद्धा या central government scheme चा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा. या लेखात, तुम्हाला योजनेचे फायदे कोणते आहेत?, योजनेचे फायदे कोणाला मिळणार आहेत?, त्यासाठी कोणत्या अटी आहेत?, या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा? या सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.
Sanjay Gandhi Niradhar Yojana Overview
Name Of Scheme | Sanjay Gandhi Niradhar Yojana |
---|---|
State | Maharashtra |
Benefits | Financial assistance of ₹ 600 to ₹ 900 per month |
Application starts Date | going on |
Last Date | |
Mode of Application | Online / Offline (Both) |
Official Website | Sanjay Gandhi Niradhar Yojana |
“संजय गांधी निराधार अनुदान योजना“ योजना नेमकी काय आहे?:
महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर या घटकांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने “Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024” सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, ₹600 प्रति महिना आर्थिक सहाय्य दिले जाते जर पात्र कुटुंबात एकच लाभार्थी असेल तर, आणि ₹900 प्रति महिना आर्थिक सहाय्य दिले जाते जर पात्र कुटुंबात एकाहून अधिक लाभार्थी असतील
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
या योजनेची काही प्रमुख उद्दीष्टे खाली दिली आहेत.
- राज्यातील दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- अंध व्यक्ती, अपंग व्यक्ती यांना आर्थिक मदत करणे.
- महिला त्याचप्रमाणे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
- वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर यांना आर्थिक मदत मिळावी.
“संजय गांधी निराधार अनुदान योजना“ अधिकृत वेबसाईट: (Official Website)
“संजय गांधी निराधार अनुदान योजना“ या योजनेची अधिकृत लिंक खाली दिली आहे. त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भात अधिक माहिती वाचू शकता.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024: Official Website
योजनेचे फायदे कोणाला मिळतील: (Sanjay Gandhi Niradhar Scheme Benefits)
या योजनेचे फायदे खाली दिलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या सर्वांना मिळणार आहेत.
- या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची, महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी.
- मोठ्या आजारांनी पीडित जसे कि क्षयरोग, कर्करोग, एड्स, कोड यांसारख्या रोगांनी ग्रस्त व्यक्तीना या योजने अंतर्गत लाभ घेता येणार आहे.
- 65 वर्षांखालील निराधार महिला किंवा पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- सर्व प्रकारच्या अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹21,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- ज्या स्रीयांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे लग्न झालेले नाही अशा स्रीयांना या योजनेद्वारे लाभ घेता येणार आहे.
- विधवा निरपराध महिला (ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या पत्नी) यांना सुद्धा हा लाभ घेता येणार आहे.
- अशा महिला ज्यांना अत्याचार सहन करावे लागले आणि वेश्यावृत्तीमधून मुक्त झालेल्या आहेत त्यांना देखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
- ट्रांसजेंडर म्हणून ओळखणाऱ्या व्यक्ती त्याचप्रमाणे मंदिर किंवा देवतेच्या सेवेसाठी समर्पित महिला यांनादेखील या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
- कारावासात असलेल्या कैद्यांच्या पत्नीला सुद्धा या योजनेसाठी अर्ज करता येईल.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी लागणारी पात्रता: (Eligibility Criteria for this Scheme)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली काही पात्रतेच्या अटी दिल्या आहेत.
- अर्ज करणारी महिला किंवा पुरुष हे महाराष्ट्र राज्याची नागरिक असावेत.
- या योजनेचा अर्ज 65 वर्षांच्या आतील व्यक्ती करू शकतात.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे नाव BPL (Below Poverty Line) कुटुंबांच्या यादीत असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹21,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for this Scheme)
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही माध्यमातून केली जाऊ शकते. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते खाली सविस्तरपणे दिले आहे.
Online Application Process:
ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांना सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024: Apply here
- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला “New User? Register Here” वरती क्लिक करायचे आहे.
- आता OTP चा ऑपशन वापरून आपला ईमेल ID आणि मोबाइल क्रमांक व्हेरिफाय करायचा आहे. त्यानंतर, एक यूजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
- आता तुमचे संपूर्ण नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वय, लिंग, आणि व्यवसाय यांसारखी माहिती भरायची आहे. त्याचप्रमाणे तुमचा पत्ता भरायचा आहे.
- अँप डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे अथवा तुम्ही लॉगिन करू शकता.
- आता १० अंकी मोबाइल नंबर (OTP द्वारे पडताळणी केली जाईल), पॅन क्रमांक, यूजरनेम, ईमेल ID (OTP द्वारे पडताळणी केली जाईल), आणि पासवर्ड भरा.
- पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा (५ केबी ते २० केबी, JPEG फॉर्मॅटमध्ये, १६० पिक्सेल रुंदी, २०० ते २१२ पिक्सेल उंची).
- ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी / अर्ध सरकारी ओळखपत्र, MNREGA जॉब कार्ड, RSBY कार्ड यापैकी कोणताही एका डॉक्युमेंट चा फोटो अपलोड करा.
- घरच्या पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, 7/12 आणि 8 अ उतारा, मालमत्ता कर पावती, मालमत्ता करार कॉपी, पाणी बिल, वीज बिल, टेलिफोन बिल, भाडे पावती यापैकी कोणताही एका डॉक्युमेंट चा फोटो अपलोड करा.
- दिलेली माहिती तपासून घ्या आणि “Register” वरती क्लिक करा. आपले लॉगिन क्रेडेन्शियल्स आपल्या ईमेल ID आणि मोबाइल नंबरवर पाठवले जातील.
- आता पुन्हा तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे आणि लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून लॉगिन करायचे आहे.
- आता डाव्या बाजूला “All Schemes” वर क्लिक करा, विभागाचे नाव आणि योजनेचे नाव निवडा, आणि संबंधित योजनेसाठी “Apply button” वर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
- अधिकृत वेबसाईट वरती “My Applied Scheme History” विभागात आपल्या अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता.
Offline Application Process:
- जर या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार/ तलाठी कार्यालयाला भेट देऊन संजय गांधी निराधार अनुदान योजने चा अर्ज घेऊ शकता.
- अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे आणि सही करायची आहे.
- जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार/ तलाठी कार्यालयात कागदपत्रांसह रीतसर भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज सबमिट करा.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for this Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे महत्वाची आहेत. या योजनेसाठी करताना खाली दिलेली कागदपत्रे सोबत ठेवावीत. Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024 documents
- Aadhar Card
- Family Ration Card
- Residential Certificate / Domicile Certificate of the State of Maharashtra.
- Age Certificate
- Bank Passbook
- Income Certificate / BPL Card of the Family
- Disability Certificate
- 2-Passport Sized Photograph (Signed Across).
- Transgender Certificate (in case the applicant is Transgender)
- Marriage Certificate, and Death Certificate of Husband (in the case of Widow applicants)
- Medical Certificate OR Certificate of Incapacity/Disease
- Any other document required by the District Social Welfare Office.
Frequently Asked Questions
Q1. संजय गांधी निराधार अनुदान योजना काय आहे?
- महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित महिला, परित्यक्ता महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचारी महिला, ट्रान्सजेंडर या घटकांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने “Sanjay Gandhi Niradhar Yojana 2024” सुरु करण्यात आली आहे.
Q2. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
Q3. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी कुटुंबात एकच लाभार्थी असल्यास आर्थिक सहाय्याची कमाल किती रक्कम मिळेल?
- कुटुंबात एकच लाभार्थी असल्यास अर्जदाराला ₹ 600 प्रतिमहिना मिळतील.
Q4. संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास आर्थिक सहाय्याची कमाल किती रक्कम असेल?
- कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास अर्जदाराला ₹ 900 प्रतिमहिना मिळतील.
Q5. अनाथ मुले संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?
- हो, अनाथ मुले या योजनेसाठी अर्ज करू शकतात.