Chhava Gudhipadva 2025 Why maharashtrian celebrate gudhipadva? Sambhaji Maharaj

Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या संदर्भात एक चक्रावून टाकणारी माहिती तुम्ही सोशल मीडियावर कुठे ना कुठेतरी वाचली असेलच. ज्यामध्ये बहुजन समाजाने गुढीपाडवा हा सण साजरा करू नये असे सांगितलेलं आहे. कारण गुढीचा संबंध औरंगजेबाने केलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी आहे.

गुढीपाडवा सण आणि संभाजी महाराज (chhava) हत्येचा संबंध ? Gudhi Padva & Sambhaji Maharaj Death Connection?

गुढीवरचा तांब्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिराचे म्हणजेच डोक्याचे प्रतीक आहे आणि औरंगजेबाच्या हुकुमावरून पुढे गुढीपाडव्याची प्रथा सुरू झाली असे सांगितले जाते. यामागे औरंगजेबाच्या संपर्कात असलेल्या काही ब्राह्मण पंडितांचा हात होता त्यामुळे बहुजनांनी गुढीवर तांब्या लावून हा सण साजरा करू नये असा मजकूर आढळतो. साधारणतः गुढीपाडव्याच्या सुमारास अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. यामुळे अनेक इतिहास प्रेमी आणि शंभूराजे भक्तांच्या मनात हे खरे की खोटे याबद्दल गोंधळ निर्माण होतो.

Chhava 
Gudhipadva 2025
Why maharashtrian celebrate gudhipadva?
Sambhaji Maharaj
Gudhipadva 2025, Chhava

आता यामध्ये गुढीपाडव्याचा गुढीवरील तांब्याचा आणि शंभूराजांच्या हत्येचा, त्यांच्या मस्तकाचा काही संबंध आहे का? तसेच औ रंगजेबाने जाणून बुजून मुद्दामच हिंदूंचा महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचा आदला दिवस शंभूराजांची हत्या करण्यासाठी निवडला होता का ? हे दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला गुढीपाडव्याचा इतिहास आणि गुढीपाडव्याचे प्रत्यक्ष कागदपत्रातील पुरावे पाहावे लागतात.

गुढीपाडवा सणाची सुरुवात कशी झाली ? why maharashtrian celebrate gudhi padwa?

आजच्या या ब्लॉग मध्ये आपण ही सर्व माहिती पाहणार आहोत. गुढीपाडव्याचे हे सर्व पुरावे काय सांगतात ते पाहू. हिंदू कालगणनेमधील फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने शंभूराजांची क्रूरपणे हत्या केली दुसऱ्या दिवशी होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच आपल्या गुढीपाडव्याच्या सणाचा दिवस. यावेळी इसवी सन 1689 हे इंग्रजी वर्ष चालू होते आणि तारीख होती 11 मार्च हा होता शालीवाहन शक 1610 चा शेवटचा दिवस दुसऱ्या दिवशी शालीवाहन शक 1611 सुरू होत होता. शक म्हणजे वर्ष, साल किंवा सण, इसवी सन म्हणजे इंग्रजी साल सुहुर सन आणि हिजरी सन म्हणजे इस्लामी साल. तसेच हिंदू कालगणनेसाठी शालीवाहन साल म्हणजेच शालीवाहन शकपासून तब्बल 1946 वर्षांपूर्वी म्हणजे इंग्रजी कालगणनेप्रमाणे इसवी सन 78 शक म्हणजे सिथियन वंशाच्या क्षत्रप नहपान या सत्ताधीशाचा सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने पराभव केला या विजयाप्रित्यर्थ इंग्रजी कालगणनेतील इसवी सन 78 या वर्षी हिंदू कालगणनेतील चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवी कालगणना सुरू झाली. ही नवी कालगणना म्हणजेच शालीवाहन शक म्हणजेच इसवी सन 78 शालीवाहन शकाचे पहिले वर्ष सुरू झाले. गौतमीपुत्र सातकर्णीने मिळवलेल्या त्या विजयाच्या आनंदाप्रित्यर्थ्य सातवाहनांच्या साम्राज्यातील लोकांनी गुढी उभारून सण साजरा केला आणि तेव्हापासून गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र आणि शेजारच्या काही राज्यातील भागात सुरू झाला अशी मान्यता आहे. Gudhipadva 2025

Chhava movie trailer

अभंग, ग्रंथ मध्ये गुढीपाडवा सणाचा आढळलेला उल्लेख ?

तेव्हापासून हा गुढीपाडवा एक सण म्हणून साजरा होत असला तरी इतर मंगल प्रसंगी महत्त्वाच्या प्रसंगी आणि आनंदाच्या प्रसंगी सुद्धा गुढ्या उभारल्या जात असत. हे आपल्या इतिहासात पुराव्यासह नमूद आहे इसवी सन 1286 सालच्या महानुभाव पंथाच्या लीळा चरित्र या ग्रंथामध्ये 175 क्रमांकाच्या लीळेमध्ये चौक रंग मालिका भरी गुढिया तोरणे उभी लिया म्हणजे उभारली असा गुढीचा उल्लेख तोरणांसह आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरी मध्ये चौथ्या अध्यायातील 52 व्या श्लोकात अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी ही ओवी आहे. गुढीचे हे दोन्ही उल्लेख सुमारे 725 वर्षांपूर्वीचे आहेत यानंतरच्या काळातील संत चोखामेळा संत जनाबाई संत एकनाथ अशा अनेक संतांच्या लिखाणात गुढीचा उल्लेख आलेला आहेच आणि ही परंपरा थेट शिवकाळापर्यंत भिडलेली दिसते ती संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून. Chhava

संत तुकाराम महाराज हे शिवाजी महाराजांचे समकालीन होते हे आपल्याला माहिती आहेच. तुकाराम महाराजांचे हे काही अभंग पहा, ||रोमांचे गुढिया डोलविती अंगे भाववळे खेळविती सोंगे रे, तुका म्हणे कंठ सद्गदीत दाटे या विठोबाच्या अंग संगे रे|| दुसरा अभंग ||बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे|| तिसऱ्या अभंगामध्ये ||आली दारा देखे हरुषाची गुढी, सांगितली पुढी हरुषे मात|| चौथ्या अभंगांमध्ये ||ब्रह्मानंदे लोक सकळ नाचती गुढीया उभविती घरोघरी, घरोघरी सुख आनंद सोहळा सडे रंग माळा चौकदारी|| शिवरायांच्याच काळात होऊन गेलेले संत तुकाराम गुढीसह ती घरोघरी उभी केल्याचा जो उल्लेख करतात. त्यातून आपल्याला 1286 सालापासून ते इसवी सन 1650 सालापर्यंत गुढीचे अस्सल कागदपत्रातील पुरावे मिळतात. Chhava

प्रत्यक्ष शिवरायांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्याचा प्रसंग तुम्हाला माहिती आहे का ?

शिवछत्रपती जेव्हा दक्षिण भारतातील मोहिमेवर निघाले तेव्हा ते 4 मार्च 1677 रोजी गोळकोंड्याला जाऊन तिथल्या अबुल हसन तानाशाहा या कुतुबशहाला भेटलेले होते. या प्रसंगाचे वर्णन करताना शिवरायांच्या राजमंडळातील एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या सभासद बखरी मध्ये लिहितात “राजे सुमुहूर्त पाहून पातशहाचे म्हणजे कुतुबशहाच्या भेटीस नगरामध्ये चाली पातशहाने कुल नगर शृंगारिले चोफेर बिदीस कुंकुम केशराचे सडे रंगमाळा घातल्या गुढिया तोरणे पताका निशाने नगरात लाविली”. यात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समारंभपूर्वक भेट घेताना कुतुबशहाने तोरणे पताका आणि निशाणांच्या बरोबरच गुढ्या सुद्धा लावल्याची महत्त्वाची माहिती कळते. आता या बकरीतील उल्लेखाशिवाय अस्सल पत्रांचेच पुरावे पाहायला गेले तर शके 1552 म्हणजे इसवी सन 1630 सालच्या एका पत्रात ग्रहणकाली कडत जोशी को मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी एक व गहू व गुढी चे पाडव्यास कुडव एक देऊ म्हणून पत्र लिहून दिले असा मजकूर आहे. दुसरे एक पत्र शके 1571 म्हणजे इसवी सन 1649 सालचे आहे. या पत्रात गुढी याचा पाडवा व चैत्री पुनीव व श्रावणी पुनीव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरा येईल तो तिघीजणी वाटून घेणे असा गुढीपाडव्याचा स्पष्ट उल्लेख आहे. सुप्याच्या पाटीलकीच्या वादासंबंधीचा हा महजर म्हणजे निवाडापत्र आहे. Chhava

आता शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या आधीचे दोन महिन्यापूर्वीचे एक पत्र आहे ते पुढीलप्रमाणे, हे पत्र 4 एप्रिल 1674 या तारखेचे आहे. यामध्ये नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाशी रायगडला आला होता तेव्हा त्याने तिथून मुंबईच्या इंग्रज डेप्युटी गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रातील मजकूर असा आहे, निराजी पंडिताचा हुकूम त्याच्या नोकराने असा आणला की शिवाजीचे पत्नीच्या मृत्यूचे सुतक फिटेपर्यंत तुम्ही आमच्याच घरी राहावे, असे रिकामपणे पाच दिवस घालविले मध्यंतरी निराजी पाडव्याकरिता म्हणजे 28 मार्च रोजी आपल्या घरी आला. या पत्रामधील निराजी रावजींना शिवराय यांनी राज्याभिषेक प्रसंगी न्यायाधीश पद दिले होते. या पत्रातील पाडवा नेमका कोणता ते आपल्याला या पत्राच्या इंग्रजी मजकुरातून समजते. हा मजकूर इन द इंटेरिम केम नाराजी पंडित टू हिज हॅबिटेशन टू सेलिब्रेट द जेंटूस न्यू इयर डे असा आहे. जेंटूस हा शब्द इथे हिंदू या शब्दासाठी वापरलेला आहे. या इंग्रजी मजकुराचा अर्थ निराजी रावजी हे हिंदू नववर्षाचा सण साजरा करण्यासाठी आले असा आहे. अर्थात हा सण म्हणजेच गुढीपाडवा इसवी सन 1674 शिवरायांच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने एका मंत्र्याने गुढीपाडव्याचा सण साजरा केल्याचा हा उल्लेख आता आपण पाहिला तो महत्त्वाचाच आहे. Gudhipadva

गुढी वरती कलश का असतो ? Gudhipadva 2025

आता थोडेसे गुढी च्या वर असणाऱ्या तांब्याविषयी माहिती पाहू. पाण्याने भरलेला तांब्या किंवा कलश हा हिंदू धर्मात मांगल्याचे सफलतेचे सुफलतेचे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. गुडीच्या काठीवर तांब्या सुलटा म्हणजे आभाळाकडे तोंड करून त्यात पाणी भरून ठेवताच येत नाही हे तर उघडच आहे. हा गुढीवरील उलटा तांब्या दुसऱ्या एका अर्थाने यशस्वीचे यशाच्या सर्वोच्च शिखराचे तसेच मुकुटाचे प्रतीक सुद्धा मानला जातो. आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व पुरावे आणि गुढीवरील तांब्याचा अर्थ पाहिल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या 1689 झालेल्या हत्येच्या अगोदर किमान 400 वर्षांपूर्वी पासून गुढीपाडव्याचा सण साजरा केला जात असल्याचे, आणि गुढीचे पुरावे आहेत. गुढीपाडव्याच्या सणाचा गुढीवरील तांब्याचा आणि औरंगजेबाने केलेल्या शंभूराजांच्या हत्येचा तसेच शंभूराजांच्या मस्तकाचा काहीही संबंध नाही. तसा संबंध जोडून गुढीवरील तांब्या हे शंभूराजांच्या मस्तकाचे प्रतीक आहे आणि तेव्हापासून गुढीपाडवा चालू झाला असे म्हणणे शुद्ध मूर्खपणा आणि साफ खोटेपणा असून तो केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा एक खालच्या पातळीचा प्रकार आहे.

एका प्राचीन हिंदू सणावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न ? An attempt to malign an ancient Hindu festival Gudhi Padva?

एका अत्यंत महत्त्वाच्या अशा प्राचीन सणावर चिखल फेक करण्याचा हा प्रयत्न तर आहेच, पण त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे आवर्जून लक्षात घेतला पाहिजे. तो म्हणजे औरंगजेब इसवी सन 1682 प्रचंड सैनिक घेऊन महाराष्ट्रात आला होता तेव्हापासून 1689 पर्यंत म्हणजे शंभूराजांच्या हत्येपर्यंत सात वर्षे तो याच दख्खनच्या भागातच होता. त्याला या भागातील हिंदूंचे दसरा दिवाळी आणि पाडवा हे सर्वात महत्त्वाचे तीन सण माहिती झालेले असणारच. मग त्याने जाणून बुजून मुद्दाम गुढीपाडव्याच्या मंगल आणि पवित्र सणाचा आदला दिवस शंभूराजांच्या हत्येसाठी निवडला होता का ? असा प्रश्न उपस्थित होता होतोच. पण या प्रश्नाचे हो किंवा नाही यापैकी कोणतेही एक उत्तर देण्यासाठी आवश्यक असलेले थेट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

तुम्हाला काय वाटते ? What is your Opinion on Sambhaji Maharaj Death and Gudhipadva Connection?

मित्रांनो औरंगजेबाने जाणीवपूर्वक गुढीपाडव्याचा आदला दिवसच शंभूराजांच्या हत्येसाठी निवडला होता का ? यावर तुमचे मत काय आहे ?, ते कमेंट मध्ये जरूर सांगा. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची ही पुराव्यासह दिलेली माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या ब्लॉग ची लिंक जरूर शेअर करा. जर तुम्ही अजून Chhava चित्रपट पहिला नसेल तर एकदा आवर्जून पाहा आणि आपल्या महापुरुषांचा इतिहास सर्वदूर पोहोचवण्यास मदत करा.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईट ला नक्की सपोर्ट करा. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. तसेच शासकीय आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती साठी आपला whatsapp ग्रुप नक्की जॉइन करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top