Table of Contents
ToggleRealme 15 Pro 5G Launched in India:
24 जुलैच्या संध्याकाळी 7 वाजता Realme ने आपली नवी 15 5G ही सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजमध्ये दोन दमदार स्मार्टफोन आहेत Realme 15 5G आणि Realme 15 Pro 5G. या फोनसाठी Realme चाहत्यांनी खूप दिवस वाट पाहिली होती.
अखेर कंपनीने अधिकृतपणे या फोनच्या लाँचची तारीख जाहीर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय! त्यामुळे टेक्नॉलॉजि मध्ये रस असणाऱ्यांना या फोन चे विशेष आकर्षण आहे. लाँच च्या अगोदरच सोशल मीडियावरील टीझरने आधीच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
डिझाइन आणि डिस्प्ले: नजरा खिळवून ठेवणारा अनुभव
Realme 15 Pro 5G मध्ये मिळतोय एक जबरदस्त 6.8 इंच AMOLED डिस्प्ले, ज्यामध्ये आहे 144Hz रिफ्रेश रेट आणि 6500 निट्स ब्राइटनेस. म्हणजे गेमिंग असो, मूव्ही पाहणं असो की सोशल मीडियावर स्क्रोल करणं सगळं काही सुपर स्मूद होणार आहे.

या फोन च्या ‘हायपरग्लो फिनिश’ आणि 4D कर्व्ह्ड स्क्रीनमुळे हा फोन दिसायलाही प्रीमियम आणि स्टायलिश वाटतो. IP69 रेटिंग मुळे धूळ आणि पाण्यापासूनही संरक्षण मिळतं म्हणजे फोन काळजीपूर्वक वापरायची गरज नाही.
परफॉर्मन्स: गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सुपरफास्ट
Realme 15 Pro 5G मध्ये आहे Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर जो 4nm टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. तर दुसरीकडे, Realme 15 5G मध्ये मिळतो MediaTek Dimensity 7300+ चिपसेट. दोन्ही डिव्हाइसेस Android 15 वर आधारित Funtouch OS 15 वर चालतात ज्यामुळे तुमचा अनुभव असेल आणखी फ्लुईड आणि स्मार्ट.
कॅमेरा आणि AI: फोटोग्राफीसाठी नवा स्टँडर्ड
Realme 15 Pro 5G मध्ये मिळतोय Sony IMX896 OIS कॅमेरा, जो 4K 60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. दुसरीकडे, Realme 15 5G मध्ये आहे 50MP ड्युअल कॅमेरा सेटअप.
AI-आधारित फिचर्ससारखे AI Party Mode आणि AI MagicGlow 2.0 तुमच्या फोटोंना देतात नैसर्गिक आणि आकर्षक लुक – अगदी प्रोफेशनल एडिटिंगशिवाय!
बॅटरी आणि चार्जिंग: एकदा चार्ज करा, दिवसभर विसरा
Realme 15 Pro 5G ची सर्वात मोठी ताकद म्हणजे याची 7000mAh ची महाकाय बॅटरी. आणि हो, ती फक्त मोठीच नाही, तर तितकीच फास्टही आहे कारण ती 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. या फोन ची बॅटरी एका चार्जमध्ये तब्बल 113 तास म्युझिक प्लेबॅक टाईम देते.
किंमत आणि उपलब्धता: बजेटमध्ये पॉवरपॅक स्मार्टफोन
लिक्स नुसार, Realme 15 Pro 5G ची किंमत सुमारे ₹35,000 असेल, तर Realme 15 5G हा फोन ₹18,000 ते ₹20,000 या दरम्यान उपलब्ध होऊ शकतो. हे दोन्ही फोन Realme India च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Flipkart वर लाँचनंतर लवकरच विक्रीसाठी येणार आहेत.
तुमचं मत काय?
Realme 15 Pro 5G बद्दल तुमचं मत काय आहे? हे फीचर्स पाहता, हा फोन तुमच्या यादीत आहे का? खाली कॉमेंट करून नक्की कळवा!