PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana 2024|Eligibility, Benefits, How to Apply?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

PM Vishwakarma Yojana 2024:

PM Vishwakarma Yojana 2024 ही भारत सरकारची एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत भारतातील पारंपरिक कलाकार आणि कारागीर यांना सक्षम करण्यासाठी आर्थिक साहाय्य, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्वतःच्या हातांनी आणि साधनांनी काम करणाऱ्यांना शेवटपर्यंत समर्थन प्रदान करणे आहे.

PM Vishwakarma Yojana 2024
Government Schemes
last date for PM Vishwakarma Yojana
how to apply for PM Vishwakarma Yojana
benefits of PM Vishwakarma Yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजना

भारतातील कारागीर समुदाय हा त्यांच्या कलेमधून भारताचा सांस्कृतिक वारसा जातन करण्याचे काम करत आहे. त्यांचे हे अमुल्य योगदान आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता भारत सरकार ने “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” सुरु केली.

या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला PM Vishwakarma Yojana 2024 या योजनेचे फायदे, पात्रतेच्या अटी आणि अर्ज प्रक्रिया यांसारख्या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.

Important links:

या भरतीसाठी महत्वाची असणारी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.

PM Vishwakarma Yojana 2024: Official Website

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना काय आहे ?: (What is PM Vishwakarma Yojana 2024)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पारंपरिक कलाकारांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, 17 सप्टेंबर 2023 रोजी “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” सुरु केली होती. या योजनेचा मूळ उद्देश असा होता कि देशातील कारागिरांना आर्थिक सहाय्य्य आणि समर्थन देणे हे होते.

PM Vishwakarma Yojana 2024: अंतर्गत येणाऱ्या व्यापारांची यादी

या योजनेअंतर्गत काही ठराविक व्यापार घेतले आहेत. जे उद्योग पारंपरिक आहेत आणि हळूहळू लोप पावत आहेत. अशा उद्योगांची यादी खाली दिली आहे.

  • लाकडावर आधारित : सुतार आणि नाव बनवणारे कारागीर.
  • लोह / धातूवर आधारित: चिलखत, लोहारकाम, हातोडा आणि अवजारे बनवणारे, कुलूप / चावी बनवणारे कारागीर.
  • सोने/ चांदीवर आधारित: सुवर्णकार.
  • मातीवर आधारित: कुंभार.
  • दगडावर आधारित: शिल्पकार, मूर्तिकार, स्टोन ब्रेकर.
  • चामड्यावर आधारित: मोची, पादत्राणे कारागीर.
  • बांधकाम : राजमिस्त्री.
  • इतर : बास्केट, चटई, झाडू, विणकर, बाहुली आणि खेळणी बनवणारे, न्हावी, धोबी, शिंपी, मासेमारी आणि जाळी बनवणारे कारागीर.

वरती नमूद केल्याप्रमाणे सर्व कारागिरांना “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” चा लाभ घेता येणार आहे.

योजनेचे फायदे: (PM Vishwakarma Yojana 2024 Benefits)

या योजनेचा अर्ज केल्यानंतर अर्जदाराला खालील फायदे मिळणार आहेत.

  • कारागिरांना दर महिन्याला ₹ 500 ची आर्थिक मदत केली जाईल.
  • कारागिरांना ₹ ३,00,000 पर्यंतचे कर्ज दिले जाईल.
  • संबंधित कामासाठी टूलकिट घेण्याकरिता ₹ 15,000 पर्यंतची प्रोत्साहन राशी दिली जाईल.
  • कारागीरांना प्रशिक्षण, सर्टिफिकेट आणि ओळखपत्र दिले जाईल.
  • लोहार, कुंभार, न्हावी, मासेमार, जाळी बनवणारे, धोबी, मोची, शिंपी सर्व कारागिरांना याचा लाभ होणार आहे.
  • या योजने अंतर्गत मार्केटिंग करायला सुद्धा शिकवले जाईल.
  • जवळपास 140 जातींना या योजनेचा फायदा होणार आहे.
PM Vishwakarma Yojana 2024
Government Schemes
last date for PM Vishwakarma Yojana
how to apply for PM Vishwakarma Yojana
benefits of PM Vishwakarma Yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजना

योजनेचे प्रमुख फायदे: (Key Benefits of PM Vishwakarma Yojana 2024)

PM Vishwakarma Yojana ही भारतातील विविध कारागिरांना त्यांचे कौशल्य वाढवणे, आर्थिक सहाय्य प्रदान करणे आणि त्यांच्या कलेला व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम म्हणून काम करते. पारंपरिक हस्तकलेसह आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून, देशभरातील कारागीरांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा उंचावणे हे या योजनेचे उद्धिष्ट आहे.

या योजनेतील काही प्रमुख फायदे खाली नमूद आहेत:

  • आर्थिक सहाय्य: कारागिरांना कच्चा माल, उपकरणे आणि नवीन साधने मिळवण्यासाठी अनुदान दिले जाईल, ज्यामुळे आधुनिकीकरण करण्यासाठी किंवा व्यवसाय विस्तार करण्यासाठी आर्थिक अडथळे कमी होण्यास मदत होईल.
  • कौशल्य विकासिकरण:
    • कारागिरांना त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी किंवा नवीन कौशल्ये शिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञाचा परिचय करून देण्यासाठी शासनाकडून प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे त्यांची कला सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल.
    • कारागिरांना ५ ते ७ दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि १५ दिवसांचे प्रगत प्रशिक्षण आले जाणार आहे.
    • प्रशिक्षण चालू असताना दररोज ₹500 इतका भत्ता दिला जाईल.
  • बाजारपेठेची उपलब्धता: “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” ही योजना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेळावे, विविध प्रदर्शने आणि ऑनलाईन मार्केटप्लेसमध्ये कारागिरांचा सहभाग वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांचे काम असंख्य लोकांपर्यंत पोहोचते आणि ग्राहकांची संख्या वाढण्यास मदत होते.
  • डिजिटल साक्षरता आणि उपलब्धता: आजच्या या डिजिटल युगामध्ये अनेक ऑनलाईन विक्रीची साधने उपलब्ध आहेत. ज्यामुळे घरबसल्या कोणतीही वस्तू जगभरात कोठेही पोहोचवण्यास मदत होते. या योजनेद्वारे कारागिरांमध्ये डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन दिले जाते. डिजिटल कशी हाताळावी, ऑनलाईन व्यवहार कसे करावे याबद्दल मार्गदर्शन होण्यास मदत होते.
  • सामाजिक सुरक्षा लाभ: या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व कारागिरांना आरोग्य विमा, अपघात विमा आणि जीवन विमा प्रदान कारागीर आणि त्यांच्या कुटुंबियांना या विम्यांचा लाभ घेता येतो.
  • क्रेडिट सपोर्ट:
    • कारागिरांना 1 लाख आणि 2 लाख असे 2 टप्प्यांमध्ये 3 लाख रुपयांचे Collateral Free “एंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन” म्हणजेच कोणताही आधार नसताना दिले जाईल. जे अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिने या कालावधी साठी दिले जाईल.
    • हे कर्ज सवलतीच्या व्याजदरावर म्हणजेच 5 टक्के दराने दिले जाईल.
    • ज्या लाभार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशे लाभार्थी पहिल्या टप्प्याचे ₹1 लाख चे कर्ज घेण्यास पात्र असतील.
    • दुसऱ्या कर्जाच्या टप्प्यात अशा लाभार्थींना कर्ज मिळेल ज्यांनी ;
      • पहिल्या टप्प्याचा लाभ घेतला आहे.
      • एक कर्ज खाते राखले आहे.
      • ज्यांच्या व्यवसायात डिजिटल व्यवहार स्वीकारले जात आहेत किंवा ज्यांनी प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

योजनेसाठी लागणारी पात्रता: (PM Vishwakarma Yojana 2024: Eligibility Criteria)

PM Vishwakarma Yojana पात्रतेच्या दृष्टीने विस्तृत आहे, विविध क्षेत्रातील कारागिरांना समाविष्ट करण्याचे या योजनेचे उद्धिष्ट आहे.

  • उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
  • उमेदवार हा पारंपरिक हस्तकला आणि कारागीर कामात सक्रियपणे गुंतललेला असावा.
  • उमेदवार हा १८ ते ६० वयोगटातील असावा.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावा.
  • उमेदवाराने यापूर्वीच या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for PM Vishwakarma Yojana)

या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. निवास प्रमाणपत्र
  4. जात प्रमाणपत्र
  5. बँक खाते तपशील
  6. पासपोर्ट साईझ फोटो
  7. मोबाइल नंबर
  8. ई-मेल आयडी

योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for PM Vishwakarma Yojana 2024)

“प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” साठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ते विस्तृतपणे खाली दिले आहे. खाली दिल्याप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता.

  • या योजनेचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना”च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

PM Vishwakarma Yojana 2024: Official Website

PM Vishwakarma Yojana 2024
Government Schemes
last date for PM Vishwakarma Yojana
how to apply for PM Vishwakarma Yojana
benefits of PM Vishwakarma Yojana
पंतप्रधान विश्वकर्मा योजना
  • अधिकृत वेबसाईट ओपन झाल्यानंतर How to Register या विकल्पावर क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर द्यावा लागेल.
  • त्यानंतर वेरिफिकेशन या विकल्पावर क्लिक करा.
  • आता रेजिस्ट्रेशन साठी चा अर्ज तुमच्यासमोर दिसेल.
  • आता तुम्हाला अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे.
  • माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यावर सबमिट बटण वर क्लिक करायचं आहे.

या स्टेप्स वापरून तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता.

निष्कर्ष:

  • भारतातील कारागीर समुदायाच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना” हे सरकारचे एक महत्वाचे पाऊल आहे.
  • आर्थिक सहाय्य, कौशल्य विकासाची संधी, बझारपेठेची उपलब्धता आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करून हस्तकला क्षेत्रात प्रगती घडवण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.

Frequently Asked Questions

Q1. What are the age criteria for PM Vishwakarma Yojana?

  • The candidate between the 18 to 60 years age group will get the benefits of this scheme.

Q2. What is the official website for PM Vishwakarma Yojana?

Q3. What are the documents required for PM Vishwakarma Yojana?

  • Aadhar Card
  • Ration Card
  • Caste Certificate
  • Bank Details
  • Passport Size Photo
  • Mobile Number
  • E-mail ID

Q4. Can women artisans apply for the PM Vishwakarma Yojana?

  • Yes, women artisans are highly encouraged to apply for the scheme.

Q5. What are the benefits of the PM Vishwakarma Yojana?

  • Financial support to purchase tools
  • Skill upgradation trainings or programs
  • Market Exposure
  • Digital literacy training
  • Social security
  • loan up to 3lacks with low interest rates

these are the several benefits of the PM Vishwakarma Yojana.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top