PM Surya Ghar Yojana 2024 ही योजना 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. या योजने अंतर्गत घराच्या छतावरती सोलर लावण्यासाठी सरकडून 40% सबसिडी मिळणार आहे. या योजनेचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे.
Table of Contents
TogglePM Surya Ghar Yojana 2024:
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे रामलल्ला चा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच देशवासीयांनी सौर उर्जेला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे या हेतूने PM Surya Ghar Yojana 2024 ची घोषणा केली.
त्यानंतर , भारत सरकारने PM सूर्य घर योजना सुरू केली, ज्यामध्ये सौर उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सोलर पॅनलच्या स्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी देण्यात आली आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे सौर उर्जा अधिकाधिक घरांमध्ये पोहोचविणे.योजना चालू केल्यानंतर एक महिन्याच्या आतच, या योजनेला एक कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.
या लेखात तुम्हाला पीएम सूर्य घर योजनेची संपूर्ण माहिती, पीएम सूर्योदय योजनेशी तुलना, अर्ज प्रक्रिया आणि या योजनेचे फायदे व तोटे कोणते आहेत यांची विस्तृत माहिती मिळणार आहे.
PM Surya Ghar Yojana Overview
Name Of Scheme | PM Surya Ghar Yojana |
---|---|
State | All |
Benefits | Subsidy for Roof Top Solar Panels, Free Household Electricity |
Application starts Date | 15 February 2024 |
Last Date | – |
Mode of Application | Online |
Official Website | PM Surya Ghar Yojana |
PM सूर्य घर योजना नेमकी काय आहे? (What is PM Surya Ghar Yojana)
PM सूर्य घर योजना त्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना त्यांच्या घरात सोलर पॅनल बसवण्याची इच्छा आहे पण ही प्रक्रिया जास्त खर्चिक असल्यामुळे त्यांनी आपले पाऊल मागे घेतले आहे. या योजनेअंतर्गत, सरकार सोलर पॅनलच्या एकूण खर्चाच्या 40% सबसिडी देते. याआधीच्या योजनेमध्ये, म्हणजेच पीएम सूर्योदय योजनेत, कमी प्रमाणात सबसिडी दिली जात होती. मात्र आता या योजनेत सुधारणा करून सबसिडी ची रक्कम वाढवली गेली आहे आणि या योजनेला PM Surya Ghar Yojana असे नाव देण्यात आले आहे.
खालील तक्त्यामध्ये दोन्ही योजनांमधील सबसिडीच्या रकमेची तुलना दिली आहे:
सोलर पॅनल क्षमता | पीएम सूर्योदय योजना सबसिडी | पीएम सूर्य घर योजना सबसिडी |
---|---|---|
1 किलोवॅट | ₹ 18,000 | ₹ 30,000 |
2 किलोवॅट | ₹ 36,000 | ₹ 60,000 |
3 किलोवॅट | ₹ 54,000 | ₹ 78,000 |
PM Surya Ghar Yojana 2024 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
या योजनेची काही प्रमुख उद्दिष्ठे खाली दिली आहेत.
- PM Surya Ghar Yojana 2024 अंतर्गत भारतातील लोकांच्या घरगुती वापराचे वीज बिल कमी करणे.
- त्याचप्रमाणे ग्रीन एनर्जी च्या वापरला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ठ आहे.
- मोफत मिळणाऱ्या सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे ज्यामुळे इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागणार नाही.
- पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवणे.
PM Surya Ghar Yojana 2024 अधिकृत वेबसाईट: (Official Website)
या योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट देऊन तुम्ही या योजनेशी संबंधित अधिक माहिती वाचू शकता. त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज देखील करू शकता.
PM Surya Ghar Yojana 2024: Official Website
योजनेचे फायदे कोणते?: (Benefits of PM Surya Ghar Yojana 2024)
PM Surya Ghar Yojana 2024 चे फायदे काही फायदे खाली दिले आहेत.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे (PMSY) भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी आणि मजबूत बनण्यास मदत होईल.
- गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना जास्त लाइट बिल भरण्याची चिंता करावी लागणार नाही.
- घरगुती वापरासाठी मोफत वीज मिळेल.
- सरकारचा वीज निर्मितीचा खर्च कमी होईल.
- केंद्र सरकार लाभार्थ्यांना जास्तीत जास्त अनुदानाचा लाभ देईल.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 अंतर्गत देशातील 1 कोटी कुटुंबांना सबसिडी चा लाभ मिळू शकतो.
- सौर रूफटॉप पॅनेल बसवल्यानंतर, लाभार्थी त्याच्या घरातील दिवे, पंखे आणि त्यांच्या क्षमतेनुसार वापरण्यास सक्षम होईल.
- या योजनेमुळे सौर ऊर्जेच्या वापरास चालना मिळेल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
आपल्या घरासाठी योग्य सोलर पॅनल कसे ठरवावे?
आपल्या घरातील विजेच्या वापरावरून सोलर पॅनलची आवश्यकता ठरवता येते. खालील गोष्टींनुसार हे समजून घेता येईल;
- 1 किलोवॅट सोलर पॅनल: दररोज 4-5 युनिट्स वीज निर्माण करते, प्रति महिना 120 युनिट्सपर्यंत पुरेसे आहे.
- 2 किलोवॅट सोलर पॅनल: दररोज 8-10 युनिट्स वीज निर्माण करते, प्रति महिना 120-240 युनिट्सपर्यंत पुरेसे आहे.
- 3 किलोवॅट सोलर पॅनल: दररोज 12-15 युनिट्स वीज निर्माण करते, प्रति महिना 240-260 युनिट्सपर्यंत पुरेसे आहे.
अर्ज करताना, आपले घराचे चालू वीज बिल अपलोड केल्यावर सिस्टम आपल्याला योग्य पॅनलची क्षमता आपोआप सुचवण्यात येते.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?
पात्रतेच्या अटी: (PM Surya Ghar Yojana eligibility 2024)
PM सूर्य घर योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर अर्जदारांनी खाली दिलेल्या पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
- या योजनेचा अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी.
- १८ वर्षांहून अधिक वय असलेला भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराच्या नावावर वीज कनेक्शन असावे.
- अर्जदाराचे घर असावे.
- घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी छप्पर असावे.
- अर्जदाराने यापूर्वी सोलर पॅनलसाठी कोणतीही सबसिडी घेतलेली नसावी.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (PM Surya Ghar Yojana 2024 application process)
PM सूर्य घर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे. पण फसवणूकीपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खाली दिल्या प्रमाणे असणार आहे
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. या योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे. (डुप्लिकेट वेबसाईट पासून सावध रहा)
PM Surya Ghar Yojana 2024: Official Website
- अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला Apply for Rooftop Solar वरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर Register वरती क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनीचे नाव, तुमचा ग्राहक क्रमांक ही सर्व माहिती भरायची आहे.
- त्यानंतर कॅप्चा कोड भरून next वर क्लिक करायचे आहे.
- आता मोबाइल नंबर द्वारे लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Apply for Rooftop Solar वर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळेल.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे.
- आता तुमच्या अर्जाला मंजुरी मिळेपर्यंत प्रतीक्षा करा. एकदा तुमच्या अर्जाला मान्यता मिळाल्यावर तुमच्या DICOM कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे तुम्ही हा सोलर प्लांट लावू शकता करा.
- एकदा तुमचे इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट चा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील.
- तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी ची रक्कम तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for this Scheme)
जर तुम्ही या अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत.
- Proof of identity. (Aadhar Card/ Pan Card/ Passport/ Driving License)
- Proof of address. (Aadhar Card/ Pan Card/ Passport/ Driving License)
- Electricity bill.
- Roof ownership certificate.
संपर्क केंद्र माहिती: (Contact Details)
जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती हवी असेल किंवा या योजनेचा अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबर शी संपर्क करू शकता. किंवा ई-मेल वरती मेल देखील करू शकता.
- Email: – rts-mnre@gov.in
- Toll Free Number: – 15555
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंर तुम्ही तुमच्या राज्यातील संपर्क केंद्राशी थेट संपर्क करण्याची माहिती तुम्हाला प्राप्त होईल.
PM Surya Ghar Yojana 2024: State Wise Contact Details
निष्कर्ष
PM सूर्य घर योजना एक आश्वासक उपक्रम आहे ज्यामुळे सौर उर्जा वापराचा प्रचार होण्यास मदत होईल आणि घरगुती वीज बिलाचा खर्च कमी होतो. या योजनेतून मिळणाऱ्या उच्च सबसिडीमुळे आणि सोप्या अर्ज प्रक्रियेने सौर ऊर्जा अधिक सुलभ आणि परवडणारी झाली आहे. त्याचप्रमाणे, संभाव्य अर्जदारांनी त्यांचे विजेची गरज, प्रारंभिक खर्च विचारात घेऊन आणि दीर्घकालीन आर्थिक फायदे विचारात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. ही योजना केवळ विजेच्या बिलात बचत करण्यासाठीच नव्हे तर हरित आणि शाश्वत भविष्यासाठीही मदत करते.
Frequently Asked Questions
Q1. PM सूर्य घर योजना काय आहे?
- ही एक सरकारी योजना आहे ज्याचा उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली होती. योजनेअंतर्गत, कुटुंबांना त्यांच्या छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाईल. ही सबसिडी सौर पॅनेलच्या किमतीच्या 40% पर्यंत दिली जाईल. या योजनेचा संपूर्ण भारतातील 1 कोटी कुटुंबांना लाभ होण्याची अपेक्षा आहे. या योजनेमुळे सरकारची प्रतिवर्षी वीज निर्मितीवरील 75,000 कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.
Q2. PM सूर्य घर योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी.
Q3. PM सूर्य घर योजनेसाठी भाडेकरू अर्ज करू शकतो का?
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी राहत्या घराचे वीज बिल ए अर्जदाराच्या नावे असणे गरजेचे आहे. आणि नियमित वीज बिल भरलेले असणे गरजेचे आहे.
Q4. PM सूर्य घर योजनेचे पैसे कधीपासून मिळतील?
- अर्जदाराला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी ची रक्कम तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.