केंद्र सरकार कडून फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना चालू करण्यात आली आहे. तुम्हाला या ब्लॉग च्या माध्यमातून PM Kisan Yojana मध्ये, साल 2024 मध्ये करण्यात आलेल्या बदलांविषयी माहिती मिळणार आहे.
Table of Contents
TogglePM Kisan Yojana 2024 New Updates
भारतातील कृषी क्षेत्र हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते, आणि त्यासाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजना. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेली ही योजना छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.
या ब्लॉग मध्ये PM Kisan Yojana योजनेबद्दल, तिचे लाभ, वैशिष्ट्ये, आणि योजनेतील बदल या सर्वांची सविस्तर माहिती मिळणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी ₹ 6,000 ची थेट आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये ₹ 2,000 ह्या प्रमाणे त्यांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर केली जाते.
PM Kisan Yojana ची उद्दीष्टे
पीएम किसान योजनेचे मुख्य उद्दीष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवून त्यांना त्यांच्या कृषी व घरगुती गरजा भागवण्यासाठी सहाय्य करणे आहे. या योजनेतून खालील उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो;
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत: आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी सावकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
- कृषी क्षेत्राला चालना: शेतकरी या निधीचा वापर बियाणे, खते, आणि इतर आवश्यक कृषी संसाधनांच्या खरेदीसाठी करू शकतात.
- शेतकऱ्यांसाठी आदरयुक्त जीवन: या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक आदरणीय होते.
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ: जरी ही रक्कम कमी असली तरी ती छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला एक प्रकारे आधार मिळवून देते.
PM Kisan Yojana New Updates 2024
पात्रता निकष:
- या योजनेचा लाभ सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना मिळतो.
- कुटुंबात पती, पत्नी, आणि अल्पवयीन मुले यांचा समावेश होतो.
- ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
- पण भूमिहीन शेतकरी या योजनेचा अर्ज करण्यास पात्र नाहीत.
आर्थिक लाभ:
- या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी ₹ 6,000 मिळतात.
- ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते, ज्यामध्ये दर 3 महिन्याला ₹ 2,000 याप्रमाणे ही रक्कम जमा होते.
- ही रक्कम योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर केली जाते.
केंद्रीय योजना:
- PM Kisan Yojana ही एक केंद्रीय (केंद्र सरकार ची) योजना आहे, म्हणजेच ती संपूर्णपणे भारत सरकारद्वारे राबवली जाते.
- या योजनेची जबाबदारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची असते.
आधार आधारित ई-केवायसी:
- PM Kisan Yojana मध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आणि योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आधार कार्ड आधारित ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
- मोबाईल अँप आणि AI-based चॅटबॉट्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेच्या अंमलबजावणीला गती दिली जात आहे.
PM Kisan Yojana 2024 अपवाद:
- या योजनेतून काही लाभार्थी श्रेण्या वगळल्या आहेत जसे की संस्थात्मक भूमीधारक, संवैधानिक पदावरील शेतकरी कुटुंबे, तसेच राज्य/ केंद्र सरकारचे अधिकारी व कर्मचारी.
PM Kisan Yojana 2024 ची आव्हाने आणि मर्यादा
PM Kisan Yojana 2024 ची काही महत्त्वाची आव्हाने आणि मर्यादा खालीलप्रमाणे आहेत;
- मजुरीने शेतकाम करणारे शेतकरी:
- या योजनेत भूमिहीन, पण जमीन भाड्याने घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश नाही, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर योजनेचा परिणाम होत नाही.
- आर्थिक मदतीचे कमी प्रमाण:
- वार्षिक ₹ 6,000 ची रक्कम शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी मानली जाते.
- जरी ती थोडीशी मदत मिळत असली तरी, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडत नाही.
- अंमलबजावणीतील आव्हाने:
- लाभार्थ्यांच्या यादीतील तफावत, निधी वितरणात उशीर, आधार लिंकिंगचे प्रश्न अशी अंमलबजावणीतील आव्हाने आढळून आली आहेत.
- प्रादेशिक विषमता:
- या योजनेचा प्रभाव विविध प्रदेशांमध्ये वेगवेगळा आहे, काही राज्यांना जास्त फायदा होताना दिसतो तर काही राज्यांमध्ये कमी.
PM Kisan Yojana 2024 मध्ये तंत्रज्ञानाचा समावेश
पीएम किसान योजनेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी सरकारने विविध तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत:
- पीएम किसान मोबाइल अँप:
- शेतकऱ्यांना या योजनेत नोंदणी, त्यांच्या हप्त्यांच्या स्थितीची तपासणी, आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मोबाइल अँप ची सुविधा आहे.
- हे अँप कोणत्याही लाभार्थी योजनेत फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-केवायसी साठी उपयुक्त आहे.
- AI- based चॅटबॉट – किसान ई मित्र:
- PM Kisan अँप मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी किसान ई मित्र चॅटबॉट समाविष्ट केला गेला आहे.
- ई- केएसटीईपी फाउंडेशन आणि भाषिणीच्या मदतीने विकसित झालेला हा चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती, देयके आणि इतर योजनांबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी मदत करतो.
PM Kisan Yojana 2024 चा परिणाम
PM Kisan Yojana 2024 चा भारतीय कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे:
- आर्थिक समावेशन:
- या योजनेने आर्थिक समावेशनाला चालना दिली असून, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्यास मदत केली आहे.
- योजनेची रक्कम बँक खात्यात थेट ट्रान्सफर केल्यामुळे शेतकऱ्यांना दलालांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे.
- covid 19 काळात समर्थन:
- covid 19 या महामारीच्या काळात PM Kisan Yojana 2024 ने शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक आर्थिक सहाय्य पुरवले, ज्यामुळे लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देणे सुलभ झाले.
- कृषी क्रियांना चालना:
- योजनेतून मिळालेल्या निधीच्या मदतीने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी संसाधनांच्या खरेदीसाठी निधी मिळाला आहे, ज्यामुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे.
- ग्रामीण संकटात घट:
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना एका स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळाल्यामुळे ग्रामीण संकट कमी झाले आहे आणि काही भागांत शेतकरी आत्महत्यांची घटना कमी झाली आहे.
या लेखात PM Kisan Yojana 2024 ची सखोल माहिती देण्यात आली आहे. या योजनेतील बदलांची माहिती सुद्धा या ब्लॉग मध्ये दिली आहे.