हयातीचा दाखला कसा काढायचा? Sanjay Gandhi Niradhar Pension Life Certificate Online 2025

हयातीचा दाखला कसा काढायचा?
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

हयातीचा दाखला कसा काढायचा?

आजच्या डिजिटल युगात सरकारच्या विविध पेन्शन योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे – ती म्हणजे हयातीचा दाखला (Life Certificate). ही एक अशी प्रक्रिया आहे जी दरवर्षी करावी लागते, अन्यथा Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana, Widow Pension, Apang Pension, Vruddha Pension सारख्या योजना थांबू शकतात.

2025 मध्ये सरकारने ही प्रक्रिया ऑनलाइन आणि मोबाइल अ‍ॅप्सद्वारे अधिक सुलभ केली आहे. या लेखामध्ये आपण BSA App KYC Marathi, Face RD App Guide, आणि संपूर्ण प्रक्रिया step-by-step समजून घेणार आहोत.

हयातीचा दाखला म्हणजे काय?

हयातीचा दाखला म्हणजे “मी अजूनही जिवंत आहे” याचा अधिकृत पुरावा. हयात प्रमाणपत्रामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणारी व्यक्ती हयात आहे असे सरकारला समजण्यास मदत होते. ज्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या पेन्शन योजना चालू राहतात. हा दाखला दरवर्षी अपडेट करावा लागतो.

ज्यांना खालील योजनांचा लाभ होतो त्यांनी हा दाखला वेळेवर देणे अनिवार्य आहे:

  • Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana
  • Widow Pension Scheme
  • Apang (Disabled) Pension
  • Vruddha Pension (Old Age Pension)

ऑनलाइन Life Certificate काढण्याची गरज का?

सर्व सरकारी योजनेमध्ये फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी सरकार दरवर्षी लाभार्थ्यांचा face-to-face किंवा biometric verification करते. पण आता ही प्रक्रिया घरबसल्या करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आता हयातीचा दाखला काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही Android मोबाईल फोन वापरून घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी खालील दोन अ‍ॅप्स आवश्यक आहेत:

हयातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी अ‍ॅप्स:

Aadhaar Face RD App

हे अ‍ॅप सरकारने चेहरा ओळखण्यासाठी (Face Authentication) तयार केले आहे. हे Aadhaar सह जोडलेले असून, तुम्ही मोबाईलचा कॅमेरा वापरून हयातीचा दाखला सादर करू शकता.

Face RD App Guide
Face RD App Guide

हे अ‍ॅप ओपन करा. कोणतीही विशेष सेटिंग करण्याची गरज नाही. फक्त इंस्टॉल करून ठेवा.

BSA App KYC Marathi

हे मुख्य अ‍ॅप आहे ज्याद्वारे तुम्ही Niradhar किंवा Widow Pension Life Certificate Online सादर करू शकता.

BSA App KYC Marathi
BSA App KYC Marathi

अ‍ॅप ओपन केल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा.

Step-by-Step प्रोसेस (KYC Process)

Step 1: भाषा निवडा आणि Device Registration पूर्ण करा

  • सर्वप्रथम, तुमच्या Android मोबाईलमधील BSA App ओपन करा.
  • अ‍ॅप ओपन झाल्यावर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल.
  • तुम्ही इंग्रजी किंवा हिंदीपैकी कोणतीही भाषा निवडू शकता.
  • यानंतर, “Proceed for Device Registration” या बटनावर क्लिक करा.
  • पुढे तुमचं Aadhaar क्रमांक आणि मोबाईल नंबर विचारलं जाईल.
  • येथे तुम्ही तुमचं किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचं Aadhaar आणि मोबाईल नंबर वापरू शकता. एकदा माहिती भरल्यानंतर तुम्हाला OTP येईल.
  • तो OTP टाका आणि डिव्हाईस रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

Step 2: लॉगिन करा व ऑपरेटर प्रकार निवडा

Device Registration पूर्ण झाल्यावर, अ‍ॅपमध्ये लॉगिन झाल्यावर तुम्हाला ऑपरेटर टाईप निवडण्याचा पर्याय दिसेल. येथे “Self and Family” हा पर्याय निवडा.यानंतर Terms & Conditions वाचा आणि “Accept” वर क्लिक करा. हे पूर्ण केल्यावर पुढील टप्प्यावर तुम्ही प्रवेश करू शकता.

Step 3: लाभार्थ्याची माहिती भरा

  • आता ज्या व्यक्तीचा हयातीचा दाखला काढायचा आहे, त्या व्यक्तीचा Aadhaar नंबर आणि मोबाईल नंबर अ‍ॅपमध्ये भरावा लागेल. ही व्यक्ती Niradhar, Widow, अपंग किंवा वृद्ध पेन्शन योजनेंतर्गत लाभार्थी असावी.
  • सर्व माहिती भरल्यानंतर “Submit” करा. नंतर त्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP टाका आणि पुन्हा Submit करा.
  • जर सगळी माहिती योग्य असेल तर “Beneficiary Validated” असा मेसेज दिसेल.
  • हाच मेसेज दिसणं खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा पुढील प्रोसेस पूर्ण होणार नाही.

Step 4: Face Authentication (Face RD App वापरून)

लाभार्थी व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यावर, KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चेहरा ओळख (Face Authentication) करावं लागेल. त्यासाठी “Scan” बटनावर क्लिक करा.

इथे तुम्हाला दोन पर्याय मिळतात:

  • Face Capture
  • Fingerprint

जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध नसेल, तर “Face Capture” पर्याय निवडा. यासाठी Face RD App आधीच इंस्टॉल केलेलं असणं आवश्यक आहे. कॅमेरासमोर लाभार्थ्याचा चेहरा ठेवा. चेहरा स्कॅन करताना डोळे मिचकवा हे केल्यावर जर हिरवा सिग्नल आला, तर समजून घ्या की तुमचं KYC यशस्वी झालं आहे.

सर्टिफिकेट डाऊनलोड कसं करायचं? – View Beneficiary Certificate

KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं हयातीचं सर्टिफिकेट तयार झालेलं असतं. हे सर्टिफिकेट पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • BSA App ओपन करा आणि मेनूमधील “View Beneficiary Certificate” या पर्यायावर क्लिक करा.
  • हयातीचा दाखला ज्या मोबाईल नंबरवर सादर केला होता, त्या नंबरवर SMS द्वारे एक BCA ID आलेला असतो. तो BCA ID अ‍ॅपमध्ये भरा.
  • त्यानंतर, त्याच मोबाईलवर आलेला OTP टाका आणि “Submit” करा.
  • OTP व्हेरिफाय झाल्यानंतर, तुमचं सर्टिफिकेट स्क्रीनवर दिसेल. यामध्ये लाभार्थ्याचं नाव, योजनेचं नाव, रजिस्ट्रेशन तारीख आणि स्कीमचा तपशील दिला जातो.

हे सर्टिफिकेट तुम्ही स्क्रीनशॉट घेवून सेव्ह करू शकता किंवा PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. हे प्रमाणपत्र पुढे सरकारी कार्यालयात सादर करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

हयातीचा दाखला काढताना या चुका टाळा :

हयातीचा दाखला कसा काढायचा? हे आपण पहिले पण दाखला ऑनलाइन काढत असताना अनेकदा काही लहान चुका होत असतात. त्यांच्यावर योग्य लक्ष न दिल्यास प्रक्रिया अर्धवट राहते. खाली काही सामान्य अडचणी व उपाय दिले आहेत:

  • OTP येत नाही: लाभार्थ्याचा मोबाईल नंबर नेटवर्कमध्ये असावा. Do Not Disturb (DND) सेवा अ‍ॅक्टिव्ह असल्यास SMS अडवले जातात, ती बंद करा.
  • Face Capture मध्ये अडचण: प्रकाशाचा अभाव, कॅमेरा खराब असणे किंवा चेहरा नीट फ्रेममध्ये न येणं, सहसा या कारणांमुळे face capture मध्ये अडचण येते. उजेडात कॅप्चर करा, चेहरा फ्रेममध्ये नीट ठेवून डोळे मिचकवा.
  • “Beneficiary Validated” न दिसणे: कधी कधी सेवा थांबलेली असते. त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
  • सर्टिफिकेट दिसत नाही: चुकीचा BCA ID किंवा Expired OTP. नवीन OTP घेऊन पुन्हा टाका.

काही महत्त्वाच्या टिप्स:

हयातीचा दाखला कसा काढायचा? यासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स माहिती असणे गरजेचे आहे. जेणेकरून अर्ज प्रक्रिया करताना कोणतीही अडचण येणार नाही.

  • Face RD App आणि BSA App दोन्ही अपडेटेड व्हर्जनमध्ये असावेत.
  • सगळ्या स्टेप्स करताना मोबाईल इंटरनेट मजबूत असावं.
  • पेन्शन वेळेवर सुरू राहण्यासाठी हयातीचा दाखला दरवर्षी वेळेत सादर करा.
  • सर्टिफिकेटची एक प्रिंटआउट आणि एक कॉपी डिजिटल स्वरूपात जतन करून ठेवा.
  • घरात वृद्ध, विधवा, अपंग व्यक्ती असतील तर त्यांना ही प्रोसेस करून द्या किंवा मदतीसाठी व्हिडिओ/ब्लॉग शेअर करा.

निष्कर्ष :

तुम्ही Sanjay Gandhi Niradhar Pension Yojana, Widow Pension, Apang Pension, Vruddha Pension किंवा कोणतीही सामाजिक पेन्शन योजना घेत असाल, तर हयातीचा दाखला वेळेत सादर करणं अत्यावश्यक आहे. आता ही प्रक्रिया खूपच सोपी झाली आहे. कोणत्याही एजंटशिवाय, कोणतेही पैसे न देता, फक्त मोबाईल वापरून तुम्ही हे करू शकता.

BSA App KYC MarathiFace RD App Guide वापरून तुम्ही घरबसल्या हयातीचा दाखला कसा काढायचा? हा लेख वाचून काढू शकता. जर तुमच्या ओळखीत वृद्ध, निराधार, विधवा किंवा अपंग व्यक्ती असतील, ज्यांना हयातीचा दाखला कसा काढायचा? या माहितीची गरज आहे, तर कृपया हा लेख त्यांच्याशी शेअर करा. तुम्ही त्यांच्या मदतीसाठी एक हात पुढे केला तर त्यांच्या पेन्शनचा हक्क वाचू शकतो.