National Saving Certificate 2024| NSC in Marathi| Eligibility, Interest Rate & Benefits

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

National Saving Certificate 2024:

National Saving Certificate म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची निश्चित- उत्पन्न योजना आहे. तुम्ही भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये या योजनेचा अर्ज करू शकता. हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये मुख्यत्वे लहान ते मध्यम गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहीत करतो.

National Saving Certificate 2024
NSC 2024
NSC in Marathi
NSC in Hindi
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

या उपक्रमामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूक दारांना आयकर मध्ये सुद्धा सवलत मिळते. तुम्ही या योजनेसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये अल्पवयीन व्यक्तीचे खाते सुद्धा काढू शकता किंवा प्रौढ व्यक्तीसोबत संयुक्त खाते देखील काढू शकता. NSC च्या कमाल खरेदीवर (Maximum Purchase limit) कोणतीही मर्यादा नाही आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र: (NSC 2024)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारने चालू केलेली निश्चित उत्पन्न देणारी एक योजना आहे. गुंतवणुकीचा एक सुरक्षित आणि कमी जोखीम असलेली योजना म्हणून या योजनेकडे पहिले जाते. या योजनेअंतर्गत तुम्ही कमीत कमी ₹ 1000 ते जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेद्वारे तुम्हाला गुंतवता येते. या बचत प्रमाणपत्रांची कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेतील गुंतवणूक हि करमुक्त आहे.

National Saving Certificate 2024
NSC 2024
NSC in Marathi
NSC in Hindi
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

योजनेची वैशिष्ठ्ये:

या योजनेची प्रमुख वैशिष्ठे खाली दिल्याप्रमाणे आहेत.

  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची किमान गुंतवणूक ही ₹ 1000 आहे. त्यामुळे कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार निश्चित स्वरूपात उत्पन्न मिळवू शकतात.
  • ही बचत प्रमाणपत्रे भारतातील सर्व पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणालाही सहज खरेदी करता येतात.
  • NSC च्या खरेदीवर कोणतीही मर्यादा नाही त्यामुळे कितीही NSC खरेदी करता येतात.
  • आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत NSC मध्ये गुंतवलेल्या मुद्दलावर 1.5 lakh पर्यंत कर सवलत मिळते.
  • या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
  • अल्पवयीन व्यक्तीच्या नावे देखील ही प्रमाणपत्रे खरेदी करता येतात.
  • जर तुम्हाला एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करायचे असेल तर NSC मध्ये ते सहजपणे केले जाऊ शकते.
  • जर तुमच्याकडून मूळ प्रमाणपत्र हरवल्यास सहजपणे डुप्लिकेट प्रमाणपत्र काढता येते.
  • या प्रमाणपत्राचा कालावधी 5 वर्षे आहे. परंतु जर गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर या मुदतीपूर्वी त्याचा वारसदार गुंतवणूक काढू शकतो.
  • या प्रमाणपत्राचा वापर करून तुम्ही कर्ज देखील काढू शकता.
also read :  Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?

योजनेचे फायदे: (National Saving Certificate 2024)

या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत;

  • निश्चित उत्पन्न: सध्या या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 7.7% व्याज दराने परतावा मिळत आहे. या योजनेमुळे साधारणपणे FD पेक्षा जास्त परतावा मिळतो.
  • कर बचत: सरकार चे समर्थन असणारी ही कर बचत योजना आहे त्यामुळे आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत NSC मध्ये गुंतवलेल्या मुद्दलावर 1.5 lakh पर्यंत कर सवलत मिळते.
  • कमी गुंतवणूक: या योजनेअंतर्गत तुम्ही कमी म्हणजेच ₹ 1000 पासून गुंतवणूक करू शकता.
  • उपलब्धता: तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आवश्यक कागदपत्रे सबमिट करून आणि KYC पडताळणी करून हे बचत प्रमाणपत्र खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे तुमचे खाते एका पोस्ट ऑफिस शाखेमधून, दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करू शकता.
  • कर्ज उपलब्धता: जर तुम्हाला कर्ज काढायचे असेल तर बँका आणि NBFC कर्ज देण्यासाठी सुरक्षा हमी म्हणून National Saving Scheme चे प्रमाणपत्र स्वीकारतात.
  • चक्रवाढ गुंतवणूक: या योजनेमध्ये तुम्ही एकदा गुंतवणूक केली कि गुंतवणुकीवर मिळवलेले व्याज चक्रवाढ होते आणि पुन्हा गुंतवले जाते.
  • मुदतपूर्व पैसे काढणे: साधारणतः, कोणताही गुंतवणूकदार या योजनेतून मुदत पूर्ण होण्याअगोदर पैसे काढू शकत नाही. परंतु, जर गुंतवणूक दराचा मृत्यू झाल्यास त्याचा वारसदार ही गुंतवणूक काढू शकतो किंवा जर पैसे कडण्यासंदर्भात न्यायालयाचा आदेश असल्यास गुंतवणूक केलेले पैसे मुदतीपूर्वी काढता येतात.

हे सुद्धा वाचा…

also read :  Free Silai Machine Yojana 2024| मोफत शिलाई मशीन योजना 2024|अर्ज कसा करावा? शेवटची तारीख ?

Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?

योजनेसाठी लागणारी पात्रता: (Eligibility Criteria for National Saving Certificate 2024)

NSC 2024 या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पाळाव्या लागतात. या अटी खाली दिल्या आहेत.

  • या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरीक असावी.
  • NSC योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वयोमर्यादेची अट नाही.
  • गुंतवणूक दराने या योजनेत सुरुवातीला कमीत कमी ₹ 1000 गुंतवणे गरजेचे आहे.
  • एक गुंतवणूकदार 5 वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय पोस्ट ऑफिसमधून NSC प्रमाणपत्र खरेदी करू शकतो.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for National Saving Certificate 2024)

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अर्ज केल्यावर पूर्वी, बँका किंवा पोस्ट ऑफिस भौतिक NSC प्रमाणपत्रे जारी करत. ही भौतिक प्रमाणपत्रे 2016 पासून बंद करण्यात आली आहेत. याक्षणी, ही प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक मोड (ई-मोड) किंवा पासबुक मोडद्वारे खरेदी केली जाऊ शकतात.

पासबुक पद्धत तितकी लोकप्रिय नाही आणि तुलनेने अधिक कंटाळवाणी आहे तरी, तुम्ही अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात्यासह NSC योजना सहजतेने खरेदी करू शकता. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की असे करण्यासाठी तुम्हाला तुमचे इंटरनेट बँकिंग सक्रिय करणे आवश्यक आहे.

NSC 2024 या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा?:

या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील steps चा वापर करावा.

  • Step 1: NSC चा अर्ज ऑनलाइन डाउनलोड करा किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळवा.
  • Step 2: विचारलेली सर्व माहिती त्या अर्जामध्ये भरा.
  • Step 3: KYC पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराने स्वतःची सही करावी आणि पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज सबमिट करा.
  • Step 4: अर्जाच्या पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे सोबत घ्या आणि तुम्हाला या योजनेत गुंतवायची असलेली रक्कम भरा.
  • Step 5: अर्जाला अधिकाऱ्यांकडून मंजूरी मिळाल्यावर, तुमचे NSC प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस मधून घ्या.
also read :  PMEGP Subsidy Scheme 2024| पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 2024|

NSC 2024 या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?:

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खालील steps चा वापर करावा.

  • Step 1: सर्वप्रथम तुम्ही भारतीय पोस्ट विभागाच्या (DOP) अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुमचे अकाउंट बनवा किंवा अकाउंट असेल तर लॉगिन करा.

Department of Posts: Login Page

National Saving Certificate 2024
NSC 2024
NSC in Marathi
NSC in Hindi
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
  • Step 2: लॉगिन केल्यानंतर ‘General Services’ अंतर्गत असणारी ‘Service Requests’ ही सेवा निवडा.
  • Step 3: त्यानंतर ‘New Requests’ वर क्लिक करा आणि ‘NSC Account – Open an NSC Account (For NSC)‘ निवडा.
  • Step 4: तुम्हाला जी रक्कम गुंतवायची आहे ती रक्कम टाईप करा आणि पोस्ट ऑफिस बचत खात्याशी लिंक केलेले डेबिट खाते निवडा.
  • Step 5: या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करण्यासाठी ‘Click Here’ निवडा. ते पूर्ण झाल्यावर अटी आणि शर्ती स्वीकारा.
  • Step 6: ट्रान्झॅक्शन पासवर्ड टाका आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • Step 7: आता तुम्हाला तुमची ठेव पावती पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी तेथे ऑपशन मिळेल.
  • Step 8: DOP च्या अधिकृत वेबसाईट वर लॉगिन करा आणि तुमच्या NSC खात्याचे तपशील पाहण्यासाठी ‘Accounts’ वर क्लिक करा.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for National Saving Certificate 2024)

या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता लागेल;

  • ओळखीचा पुरावा, जसे की पासपोर्ट, परमनंट अकाउंट नंबर (पॅन) कार्ड, ड्रायव्हरचा परवाना, ज्येष्ठ नागरिक आयडी किंवा इतर कोणतीही अधिकृत सरकारी ओळखपत्र
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • राहत्या पत्ता पुरावा, जसे की वीज बिल, पासपोर्ट, फोन बिल किंवा बँक स्टेटमेंट.

योजनेचे हस्तांतरण: (Transfer of National Saving Certificate)

या योजनेचे सहजरित्या हस्तांतरण केले जाऊ शकते. खाली हस्तांतराची काही उदाहरणे दिली आहेत;

  • NSC प्रमाणपत्र एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • NSC प्रमाणपत्र हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देखील हस्तांतरित केले जाऊ शकते.
  • व्यक्तिगत हस्तांतरण केलेले असल्यास प्रमाणपत्र तेच राहील मात्र नवीन मालकाचे नाव त्या प्रमाणपत्रामध्ये नमूद केले जाईल.