फक्त याच शेतकर्यांना Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna या योजने अंतर्गत मिळणार 95% अनुदान ? पात्र शेतकर्यांना महाराष्ट्र सरकार 1,00,000 सौर पंप उपलब्ध करून देणार आहे आत्ताच जाणून घ्या काय आहेत सरकारच्या अटी…
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna: 2019 मध्ये ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती. या योजने अंतर्गत पात्र शेतकर्यांना महाराष्ट्र सरकार 1,00,000 सौर पंप उपलब्ध करून देणार आहे. सौर उर्जेवर चालणार्या या पंपाचा वापर शेतकर्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांचा आर्थिक भार कमी करण्यास मदत होणार आहे. या सौर पंपाच्या वापरामुळे डीझेल आणि इलेक्ट्रिक पंपांचा वापर कमी होईल ज्यांच्या वापरासाठी प्रचंड खर्च येतो.

हा पंप बसवण्यासाठी, पंपाच्या खर्चाच्या 90 ते 95% खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. या योजनेमुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या जमिनीला दिवसा सुद्धा सिंचन करता येऊ शकते. पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हा एक उत्तम पर्याय आहे. कमी खर्चात खूप फायदेशीर असा हा उपक्रम राज्य सरकारने राबवला आहे.
या लेखा मध्ये तुम्हाला Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna या योजनेसंबंधित सर्व माहिती सविस्तररित्या वाचायला मिळणार आहे. जसे की या योजनेचे फायदे , पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपर्क केंद्र आणखी बरीच माहिती मिळेल.
Table of Contents
Toggleयोजनेचा हेतू: (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna)
- Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna योजनेमार्फत राज्यातील शेतकर्यांची मदत व्हावी यासाठी ही योजना आणली आहे.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांना solar pump दिला जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकार 90% खर्च करणार आहे तर उरलेले 10% हे अर्जदारला करावे लागणार आहेत. त्यामुळे
शेतकर्यांचा बहुतांश खर्च वाचणार आहे. - या योजनेमुळे शेतकर्यांना दुकानातून महागडी मशीन खरेदी करावी लागणार नाही .
- या solar pump मुळे पर्यावरणास कोणतीही हानी होणार नाही.
वाचकांना निवेदन आहे की या ब्लॉग मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे हा ब्लॉग संपूर्ण वाचावा. ब्लॉग आवडल्यास कमेन्ट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा हा ब्लॉग शेअर करा…
योजनेचे फायदे : (Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna Benefits)
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2023 चे शेतकर्यांसाठी अनेक फायदे आहेत , जसे की ;
- शेतकर्यांना अतिशय कमी किमतीत सिंचनासाठी सोलार पंप उपलब्ध होतो आणि त्यांना पंप सेटच्या एकूण किमतीच्या 10% रक्कम भरावी लागते आणि बाकीचे आनुदान सरकारकडून दिले जाते .
- डिझेल आणि वीज पंपावर अवलंबून राहणे कमी होते जे की महाग आहेत आणि त्यामुळे प्रदूषण होते.
- शेतकरी आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार सिंचन करू शकतो कारण सौर पंप हा सौर उर्जेवर कार्य करतो.
- शेतकर्यांचे उत्पन्न आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते कारण ते त्यांच्या शेतात अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे सिंचन करू शकतात.
- सौर पंप, ग्रिड पावर वापरत नसल्यामुळे व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होतो.
पात्रता : (Eligibility for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली काही पात्रतेच्या अटी दिल्या आहेत त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
- Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna योजनेमार्फत राज्यातील शेतकर्यांची मदत व्हावी यासाठी ही योजना आणली आहे.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांना solar pump दिला जाणार आहे.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकार 90% खर्च करणार आहे तर उरलेले 10% हे अर्जदारला करावे लागणार आहेत. त्यामुळे
शेतकर्यांचा बहुतांश खर्च वाचणार आहे. - या योजनेमुळे शेतकर्यांना दुकानातून महागडी मशीन खरेदी करावी लागणार नाही .
- या solar pump मुळे पर्यावरणास कोणतीही हानी होणार नाही.
पंपाच्या क्षमतेनुसार पात्रता :
पंपाच्या क्षमतेनुसार असणाऱ्या पात्रतेच्या अटी खाली दिल्याप्रमाणे असणार आहेत.
- 3HP आणि 5HP सौर उर्जेवर चालणार्या पंपांसाठी:
5 एकर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकर्यांना 3HP पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकर्यांना 5HP पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - 7.5HP सौर उर्जेवर चालणार्या पंपांसाठी:
5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकर्यांना 7.5HP पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
Category | 3HP Beneficiary Coast | 5HP Beneficiary Coast | 7.5HP Beneficiary Coast |
General | ₹ 16,560 | ₹ 24,710 | ₹ 33,455 |
SC | ₹ 8,280 | ₹ 12,355 | ₹ 16,728 |
ST | ₹ 8,280 | ₹ 12,355 | ₹ 16,728 |
हे सुद्धा वाचा…
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेच्या अटी :
- पंपातून पाण्याचा स्त्रोत विहीर किंवा कुपनलिकाच (tube well) असावा.
- पंपासाठी पाण्याच्या स्त्रोताची खोली 60 मीटर पेक्षा जास्त नसावी.
- एका शेतकर्याला फक्त एकदाच आणि एकच सौर कृषि पंप दिला जाईल.
- जर अर्जदार शेतकर्याच्या कोणत्याच शेतात पाण्याच्या स्त्रोत उपलब्ध नसेल तर त्या शेतकर्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
लागणारी कागदपत्रे : (Documents required for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- जात प्रमाणपत्र (SC/ST)
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनीचा 7/12 उतारा व 8अ
- जमिनीत सह हिस्सेदार असल्यास हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाण पत्र
- बँक खात्याचा तपशील
अर्ज कसा आणि कुठे करावा ? : (How to Apply for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna)
राज्यातील ज्या शेतकर्यांना Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2024: Official Website

- वेबसाइट वर पोहोचल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. त्यामध्ये वरती Beneficiary Services (लाभार्थी सेवा) या लिंक वर क्लिक क्रयचे आहे.
- तुमच्यासमोर नवीन पेज येईल त्यामध्ये, अर्ज करा बटनावर गेल्यावर तुम्हाला नवीन ग्राहक (3/5 HP) सिलेक्ट ककरायच आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती भरायची आहे.
- आवश्यक असणारी कागदपत्रे तुम्हाला अपलोड कराची आहेत.
- सर्व माहिती नीट भरून झाल्यानंतर साबमीट वरती क्लिक करायची आहे.
How to check application status:
- सर्वप्रथम महावितरण च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
- त्यानंतर “Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna” विभागात “application status” वर क्लिक करा.

- आता तुम्हाला तुमचा application number किंवा Aadhar नंबर लिहा आणि सर्च बटन वर क्लिक करा
- सर्च केल्यानंतर तुम्हाला application status स्क्रीनवर दिसेल.
Solar Pump मिळण्यासाठी किती कालावधी लागेल?
- अद्याप सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची यादी किंवा पंप वितरणाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
- परंतु प्राप्त झालेल्या अर्जंची पडताळणी व मंजुरी आणि पात्र शेतकर्यांना हे सोलार पंप वितरित कारणासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- पंप वितरित करण्यापूर्वी सरकार शेतकर्यांसाठी या उपक्रमाबद्दल जनजागृती कार्यक्रम राबवू शकते.
संपर्क केंद्र माहिती : (Contact details for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna)
या योजनेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किंवा अर्ज करताना तुम्हाला कोणताही अडथळा येत असल्यास खाली दिलेल्या नंबर वरती फोन करा किंवा ई-मेल वरती तुमचे प्रश्न लिहून सेंड करा.
- Helpline Number
1800-212-3435
1800-233-3435 - Email
agsolar.support@mahadiscom.in
cedist.solarmsedcl@gmail.com
Frequently Asked Questions
Q 1. Documents required for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna? मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना साठी लागणारी कागदपत्रे ?
- Aadhar Card
- Ration Card
- Valid Mobile Number
- Valid Email ID
- Passport Size Photos
- Caste Certificate (SC/ST)
- ७/१२ utara
- Bank account details.
Q 2. How to apply for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna?
- go to the official website https://www.mahadiscom.in/solar/index.html and select your pump category and fill the form.
Q 3. How much amount should I pay to avail Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna?
- you have to pay only 10% amount of the total coast.
Q 4. What is the subsidy in Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna?
- The government offers 90 to 95% subsidy to this scheme.
Q 5. What is the subsidy in Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna?
- The govt. will give 1,00,000 solar pumps those will work using solar energy.
- These pumps are easy to use.
- The Farmers will save money and use it in daytime also.
Q 6. मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेचा फायदा काय आहे?
- मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचनासाठी सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी 95% अनुदान दिले जाते.
Q 7. Who is eligible for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna?
- Individual Farmers / Group of Farmers / Cooperatives / Panchayats / Farmer Producer Organizations (FPO) / Water User associations (WUA) are eligible for Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna.