Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत त्याचप्रमाणे तीन घरगुती वापराचे LPG सिलेंडर शासनाद्वारे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Table of Contents
ToggleMukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश सरकारने सुरू केली होती. गरीब महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. मध्यप्रदेश सरकार च्या या योजनेच्या धरतीवर, अलीकडेच झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत त्याचप्रमाणे तीन घरगुती वापराचे LPG सिलेंडर शासनाद्वारे उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जर तुम्ही महिला असाल किंवा तुमच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा असेल तर हा लेख काळजीपूर्वक वाचा. या लेखामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली आहे. ज्यामध्ये तुम्हाला या योजनेचे फायदे कोणते आहेत?, योजनेचे फायदे कोणत्या महिलांना मिळणार आहेत?, त्यासाठी कोणत्या अटी आहेत?, या योजनेचा अर्ज कसा आणि कुठे करायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यासाठी हा संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Overview
Name Of Scheme | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana |
---|---|
State | Maharashtra |
Benefits | Financial assistance of Rs.1500 per month |
Application starts Date | 1 July 2024 |
Last Date | |
Mode of Application | Online / Offline (Both) |
Official Website | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana |
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना नेमकी काय आहे?:
महाराष्ट्र राज्यातील गरीब महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजने मुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक पाऊल आहे. या योजनेच्या अंमलबजावणी करीता आणि अर्जदाराला कागदपत्रे जमा करताना होणारा त्रास कमी करण्यासाठी अलीकडेच, या योजनेच्या अटी आणि आवश्यकतांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:
या योजनेची प्रमुख उद्दीष्टे खाली दिली आहेत.
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- त्याचप्रमाणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.
- राज्यातील महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे.
- महिला त्याचप्रमाणे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
- गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अधिकृत वेबसाईट: (Official Website)
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची अधिकृत लिंक खाली दिली आहे. त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही या योजनेसंदर्भात अधिक माहिती वाचू शकता.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: Official Website
योजनेचे फायदे कोणाला मिळतील: (Who will get the Benefit of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)
या योजनेचे फायदे खाली दिलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मिळणार आहेत.
- लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
- राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना सुद्धा या योजनेद्वारे लाभ मिळणार आहे.
- ज्या महिलांचे किमान वय 21 वर्षे आणि कमल वय 60 वर्षे (वयाची मर्यादा 60 वर्षांवरून 65 वर्षे केली आहे) आहे अशा महिलांना हा लाभ मिळणार आहे.
- सादर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असावे.
हे सुद्धा वाचा …
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
- PM Kisan Yojana 2024| पी एम किसान योजना 2024| PM Kisan Yojana New Updates 2024
- RRB JE Notification 2024| 7951 Vacancies Available| Apply Online
- IQVIA is Hiring for Power BI Data Analyst| Data Analyst| 8 LPA Salary
Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत करण्यात आलेले बदल:(New Changes made in the scheme)
या योजनेची ऍप्लिकेशन पद्धती अधिक सोपी करण्यासाठी या योजनेच्या अटींमध्ये काही महत्वपूर्ण बदल केले गेले आहेत.
- वयोमर्यादेत वाढ: पात्र महिलांसाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्षांवरून 65 वर्षे केली आहे. हा बदल वृद्ध महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी करण्यात आला आहे.
- अविवाहित महिलांसाठी: एका कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिला सुद्धा आता योजनेचा लाभ घेऊ शकते. हा बदल तरुण महिलांना मदत व्हावी यासाठी केला गेला आहे.
- बँक अकाउंटची आवश्यकता: प्रत्येक पात्र महिलेकडे तिच्या आधार नंबरशी लिंक असलेले बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. त्यामुळे 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्या महिलेच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना योजनेसाठी लागणारी पात्रता: (Eligibility Criteria for this Scheme)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली काही पात्रतेच्या अटी दिल्या आहेत.
- अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी.
- किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय 65 वर्षे (नवीन बदलांप्रमाणे) असावे.
- अर्ज करणाऱ्या महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
इतर राज्यातील महिलांही करू शकता अर्ज:
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अशा महिलांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
अर्ज करण्याची मुदत: (Last Date to Apply for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)
अर्ज प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी सुरुवातीला ठरवलेली तारीख आता बदलण्यात आली आहे.
- या योजनेचा अर्ज करण्यास 1 जुलै 2024 पासून सुरुवात झाली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Majhi Ladki Bahin Yojana last date) आता 31 जुलै वरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
- 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या सर्व महिलांना 1 जुलै 2024 पासून 1500 रुपये दरमहिना आर्थिक मदत मिळेल.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for this Scheme)
महिलांना या योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहे.
Online Application Process:
- जर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास त्यांना तो स्वतः मोबाईल अँप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे भरता येणार आहे.
- मोबाईल अँप्लिकेशन द्वारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत (Narishakti Doot) नावाचे अँप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. या अँप्लिकेशन ची लिंक खाली दिली आहे.
Narishakti Doot App: Official Link
- अँप डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे अथवा तुम्ही लॉगिन करू शकता.
- सर्व माहीती भरून रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला id आणि password मिळेल तो वापरून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर खाली 4 ऑपशन दिसतील त्यामध्ये नारीशक्ती दूत वर क्लिक करायचे आहे.
- त्यामध्ये तुम्हाला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेचा अर्ज दिसेल.
- आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली माहिती भरायची आहे. आणि कागदपत्रे अपलोड करायची आहेत. आणि अर्ज सबमिट करायचा आहे.
- या अर्जासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
Offline Application Process:
- जर या योजनेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही गावच्या ग्रामसेवक किंवा अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत रजिस्टर करता येईल.
- ग्राम पंचायत स्तरावर या योजनेचे अर्ज उपलब्ध आहेत.
- ऑफलाईन अर्ज करणाऱ्या महिलांना अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्राम पंचायत, वार्ड आणि सेतू सुविधा केंद्र येथे त्यांचे अर्ज सबमिट करता येतील.
- या अर्जासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
Offline Form Download Link:
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: Application Form
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for this Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे महत्वाची आहेत. Majhi Ladki Bahin Yojana documents
- Aadhar Card
- Family Ration Card
- Caste Certificate
- Age Certificate
- Residence Certificate
- Bank Passbook
- Passport Size Photo
खाली दिल्याप्रमाणे काही कागदपत्रे नसली तरीसुद्धा तुम्ही हा अर्ज करू शकता:
अलीकडेच शासनाने कागदपत्रांसंदर्भातील काही अटी शिथिल केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत.
- उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही:
- 2.50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- पिवळा आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही.
- अधिवास दाखला (Domicile Certificate):
- अधिवास दाखला ची अट शिथिल केली आहे.
- महिलांना आता 15 वर्षे जुने रेशन कार्ड, वोटर आयडी कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला हे अधिवास दाखला म्हणून वापरता येईल.
- बँक अकाउंट संबंधी:
- अर्जदाराला बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साइज फोटो आणि योजनेच्या अटी व शर्तींचे पालन करण्यासाठी गॅरंटी लेटर सादर करणे आवश्यक आहे.
- पर राज्यातील महिला संबंधी:
- परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अशा महिलांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
ई-केवायसी आणि व्हेरिफिकेशन: (E-KYC & Verification)
अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जदारांचे ई-केवायसी आणि व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलेला स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- E-KYC प्रोसेस दरम्यान अर्जदाराचा फोटो घेतला जाईल.
- वेरिफिकेशन साठी अर्जदाराला तिचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी घेऊन यावे लागेल.
अपात्रतेच्या अटी: (Ineligibility Criteria for Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024)
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 या योजनेचा अर्ज करताना काही अटींची पूर्तता तुम्हाला करायची आहे. या अटींची पूर्तता करताना जर तुम्ही खाली दिलेल्या निकषांमध्ये बसत असाल तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- High Income: 2.50 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पिवळा किंवा ऑरेंज रेशन कार्ड नसल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- Taxpayers: आयकर भरणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- Permanent Employees: सरकारी किंवा स्थानिक संस्थांमध्ये रेग्युलर किंवा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी असलेल्या कुटुंबांना हा लाभ मिळणार नाही.
- Pensioners: जर कुटुंबातील व्यक्तीला शासकीय पेन्शन चालू असेल तर हा लाभ घेता येणार नाही.
- Farmers: पाच एकरांपेक्षा जास्त शेती असणाऱ्यांनाही योजनेतून वगळले आहे.
- Vehicle Owners: चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांना (ट्रॅक्टर वगळता) लाभ मिळणार नाही.
- Existing Financial Benefits: इतर सरकारी योजनांद्वारे 1500 रुपयांपेक्षा जास्त मिळणाऱ्या महिलांना लाभ मिळणार नाही. परंतु, जर 1500 रुपयांपेक्षा कमी मिळत असेल तर ती रक्कम या योजनेतून पुरवली जाईल.
Frequently Asked Questions
Q1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
- ही योजना सर्वप्रथम मध्य प्रदेश सरकारने सुरू केली होती. गरीब महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. मध्यप्रदेश सरकार च्या या योजनेच्या धरतीवर, अलीकडेच झालेल्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” लागू करण्याची घोषणा केली आहे.
Q2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय हे 21 वर्षे ते 65 वर्षे या दरम्यान असावे. (नवीन बदलानुसार वयोमर्यादा 60 वरून 65 करण्यात आली आहे.)
Q3. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करू शकतो?
- या योजनेसाठी जुलै पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याचा कालावधी 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला आहे.
Q4. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे कधीपासून मिळतील?
- जेव्हा अर्ज प्रक्रिया पूर होईल त्यावेळी एक यादी प्रसिद्ध करण्यात येईल या यादीवर आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी दिला जाईल.त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल आणि ज्यांचे नाव या यादीत असेल त्यांना 1 जुलै पासूनचे ₹ 1500 मिळण्यास सुरुवात होईल.