MSRTC Apprentice Recruitment 2024:
MSRTC Apprentice Recruitment 2024 मार्फत तब्बल 256 रिक्त जागांसाठी भरती होणार असल्याचे, 24 मे 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत जाहिराती मध्ये सांगितले आहे. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भारतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे.

MSRTC च्या धुळे विभागासाठी ही भरती होत आहे. या लेखामध्ये तुम्हला MSRTC Apprentice Recruitment 2024 या भारतीबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे वाचायला मिळेल. हा लेख वाचल्यानंतर तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता.
MSRTC म्हणजे काय?: (What is MSRTC)
MSRTC चा full form “MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION“ असा आहे. “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ” ही संस्था महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण तसेच शहरी भागात बस सेवा देण्याचे कार्य करते. ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये जवळपास 1,02,000 इतके कर्मचारी कार्यरत आहेत.
MSRTC Apprentice Recruitment Overview
Organization | MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION |
---|---|
Post | multiple |
Vacancies | 256 |
Application starts Date | 24 May 2024 |
Last Date | 6 June 2024 |
Age limit | 16 years to 33 years |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 500/- only |
Official Website | MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION |

अधिकृत जाहिरात: (MSRTC Apprentice Recruitment Notification 2024)
“महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ“ ने 256 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
MSRTC Apprentice Recruitment 2024: Official Notification

अर्जाची लिंक: (MSRTC Apprentice Recruitment 2024 Application)
“महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ“ या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला राज्य परिवहन महामंडळ, धुळे विभाग येथे कार्यालयीन वेळेत (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचा दिवस वगळून) 6 जून दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध असणार आहेत.
महत्वाचे दिनांक: (Important Dates for MSRTC Apprentice Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 24 मे 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 6 जून 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for MSRTC Apprentice Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- एस टी महामंडळाची ही भरती धुळे विभागासाठी होणार आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सर्वप्रथम तुम्हाला या भरतीचा अर्ज महामंडळ च्या धुळे विभागाच्या कार्यालयात मिळणार आहे.
- तुम्हाला महामंडळ च्या धुळे विभागाच्या कार्यालयाला 6 जून पूर्वी भेट देऊन या भरतीचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्ज घेतल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे.
- त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लावायचा आहे.
- कागदपत्रे जोडायला सांगितल्यास तुमच्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून या अर्जासोबत द्यायची आहे.
- तुम्हाला हा अर्ज 6 जून 2024 ला सायंकाळी 5 वाजेपर्यंत एस टी महामंडळ चे धुळे विभागाचे कार्यालय येथे जमा करायचा आहे.
या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जून 2024 आहे. 6 जून 2024 नंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “MSRTC” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for MSRTC Apprentice Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
General | Reserved Category |
---|---|
₹ 500 | ₹ 250 |
- तुम्हाला अर्जाचे शुल्क हे डिमांड ड्राफ्ट किंवा इंडियन पोस्टल ऑर्डर च्या माध्यमातून भरायचे आहेत.
- “एम. एस. आर. टी. सी. फंड अकौंट पेयबल यात ऍट धुळे” या नावाने हे शुल्क जमा करायचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
- या अर्जासोबत बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे.

एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)
MSRTC Apprentice Recruitment 2024 ही भरती 256 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
POST wise Vacancies
Post Name | Vacancies |
---|---|
Motor Mechanic Vehicle | 65 |
Diesel Mechanic | 64 |
Sheet Metal Worker | 28 |
Welder | 15 |
Electrician | 80 |
Turner | 2 |
Mechanical/ Automobile Engineer/ Diploma | 2 |
Total | 256 |
हे सुद्धा वाचा …
- Chhava शंभूराजे, गुढीपाडवा आणि औरंगजेब ! why maharashtrian celebrate gudi padwa? Gudhipadva 2025|Chhava|
- Union Budget 2025| केंद्रीय अर्थसंकल्प 2025| सखोल विश्लेषण| जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग ?
- नवीन जनरेशन टोयोटा कॅमरी भारतात लाँच। Toyota Camry is bringing additional power to an EV battle 2025
- TVS Raider iGO: दमदार मायलेज व टॉर्कसह TVS ने लाँच केली आहे नवीन बाईक| 125 CC Bikes in India
- Software Tester| Kwalee Off Campus Drive 2024| Hiring for Junior QA Tester| Software Tester Job| Game Tester Job
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for MSRTC Apprentice Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली तक्त्यामध्ये दिली आहे.
Post Name | Qualification |
---|---|
Motor Mechanic Vehicle | 10th+ ITI (Motor Mechanic) |
Diesel Mechanic | 10th+ ITI (Diesel Mechanic) |
Sheet Metal Worker | 10th+ ITI (Sheet Metal) |
Welder | 10th+ ITI (Welding) |
Electrician | 10th+ ITI (Automobile Electronics) |
Turner | 10th+ ITI (Turner) |
Mechanical/ Automobile Engineer/ Diploma | B.E. Mechanical / Automobile |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीसाठी असणारी वयोमर्यादा खाली तक्त्यामध्ये दिली आहे. या भरतीची वयोमर्यादा 22 मे 2024 प्रमाणे गणली जाणार आहे.
- या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 16 वर्षे आहे तर कमाल वयोमर्यादा 33 वर्षे आहे.
- मागासवर्गीय उमेदवारांना या वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया: (Selection Process for MSRTC Apprentice Recruitment 2024)
- या भरतीसाठी कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही.
- मागासवर्गीय उमेदवारांची 1:17 तर इतर उमेदवारांची 1:10 या प्रमाणे यादी मागवण्यात येईल आणि त्या यादीमधून अँटी निवड केली जाईल.
- योग्य वेळेत यादी प्राप्त न झाल्यास राज्य परिवहन सेवेत असलेले व सेवेतून निवृत्त झालेल्या धुळे विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची प्राप्त झालेल्या अर्जातून भरती करण्यात येईल.
उमेदवाराने रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय / समाजकल्याण कार्यालय / एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय इ. अधिकृत संस्थेचं नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणी पत्राची प्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा अथवा मुलाखत होणार नाही, याबद्दल कोणतीही माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली नाही.
लागणारी कागदपत्रे: (Documents Required)
या भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- Aadhar Card
- 10th Marksheet
- 12th Marksheet
- Degree Certificate
- Caste Certificate
- Passport size photo
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या वेतन किंवा भत्त्याबद्दल अधिकृत जाहिरातीमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
Frequently Asked Questions
Q1. What is the last date to apply for MSRTC Apprentice Recruitment 2024?
- The last date to apply for MSRTC Apprentice Recruitment is 6 June 2024.
Q2. What is the full form of MSRTC?
- MSRTC full form is MAHARASHTRA STATE ROAD TRANSPORT CORPORATION.
Q3. How many vacancies are there for MSRTC Apprentice Recruitment?
- Overall, there are 256 vacancies available for MSRTC Apprentice recruitment 2024.