Indian Army SSCW Recruitment 2025| 31 Posts Apply Online

Indian Army SSCW Recruitment 2025| 31 Posts Apply Online
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

Indian Army SSCW Recruitment 2025:

Indian Army SSCW (Tech) Recruitment 2025 मार्फत Short Service Commission (Tech) – 66 साठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भारती अंतर्गत महिला अभियंता पदवीधारकांसाठी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा करण्याची एक संधी मिळणार आहे.

यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स अशा विविध अभियांत्रिकी शाखांमधील एकूण 31 रिक्त पदांवर भरती होणार आहे. त्याचप्रमाणे सेवेत असताना वीरमरण आलेल्या संरक्षण दलातील जवानांच्या विधवा पत्नींसाठीही यामध्ये राखीव जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Indian Army SSCW Recruitment 2025 Notification:

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 23 जुलै 2025 पासून सुरू होऊन 21 ऑगस्ट 2025 पर्यंत चालू राहणार आहे. तर, विधवा उमेदवारांसाठी असलेले ऑफलाइन अर्ज पूर्ण करून 29 ऑगस्ट 2025 पर्यंत Directorate General of Recruiting या कार्यालयात पोहोचवणे गरजेचे आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना OTA (Officers Training Academy), चेन्नई येथे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण काळात त्यांना मासिक ₹56,100 स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाईल, ज्याचे वेतनश्रेणी ₹56,100 ते ₹1,77,500 दरम्यान असेल, त्यासोबतच विविध भत्ते आणि सुविधा देखील मिळतील.

Indian Army SSCW Recruitment 2025 Overview:

ParameterDetails
Course NameSSCW (Tech) – 66 Women
Conducting BodyIndian Army
Total Vacancies31 (29 Technical + 2 Widow entries)
Eligible StreamsCivil, Computer Science/IT, Electrical, Electronics/Telecom, Mechanical
Age Limit20–27 years (Tech), up to 35 years (Widows)

Indian Army SSCW Bharti 2025 Total Vacancies:

StreamVacancies
Civil Engineering7
Computer Science/IT4
Electrical Engineering3
Electronics/Telecom6
Mechanical Engineering9
Widows (Tech)1
Widows (non-Tech)1
Total29 + 2

Important Dates:

तपशीलतारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख23 जुलै 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख21 ऑगस्ट 2025
पूर्ण झालेले ऑफलाइन अर्ज Dte Gen of Rtg येथे पोहोचण्याची अंतिम तारीख29 ऑगस्ट 2025

टीप: सर्व अर्ज पूर्ण आणि योग्य रीतीने भरून संबंधित कार्यालयात वेळेत पोहोचणे आवश्यक आहे.

Eligibility Criteria for Indian Army SSCW Recruitment 2025

Age Limit:

  • SSCW (Tech) उमेदवारांसाठी: २० ते २७ वर्षे (जन्मतारीख ०१ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००६ दरम्यान असावी)
  • विधवा उमेदवारांसाठी: ३५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा लागू

Education:

  • SSCW (Tech) उमेदवारांसाठी: संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree) आवश्यक आहे.
  • विधवा उमेदवार (non-Tech) साठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation in any discipline) असणे आवश्यक आहे.

Documents Required for Indian Army SSCW Recruitment 2025

ऑनलाइन नोंदणी करताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

  • दहावीचे प्रमाणपत्र
  • बारावीचे प्रमाणपत्र
  • अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्र (अथवा प्रोव्हिजनल)
  • ओळखपत्र (ID Proof) आधार कार्ड / PAN कार्ड / पासपोर्ट यापैकी एक आवश्यक
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • डोमिसाईल सर्टिफिकेट
  • जात प्रमाणपत्र

Important Notes

  • अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांनी सर्व मार्कशीट व उत्तीर्णतेचा पुरावा ०१ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.
  • मूळ कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास किंवा योग्य कागदपत्र सादर न केल्यास उमेदवाराची पात्रता रद्द केली जाऊ शकते.
  • दहावीचे प्रमाणपत्र वगळता कोणतेही इतर वयाचे प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही.

हे सुद्धा वाचा …

NMMC Medical Officer Bharti 2025: How to Apply?

Online Application Process for Indian Army SSCW Recruitment 2025

  • SSC (Tech) – 66 Women Course साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर भेट द्यावी.
  • त्यानंतर “Officer Entry Apply/Login” या पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करावी.
  • जर आपण नवीन युजर असाल, तर आपली माहिती भरून प्रथम नोंदणी करावी लागेल. आधीच नोंदणी केले असल्यास, आपले युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे.
  • लॉगिन केल्यानंतर, आपल्या डॅशबोर्डमध्ये “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर “Short Service Commission (Tech) – 66 Women” या भरतीची निवड करा.
  • फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि अभियंता शाखेची माहिती अचूक भरावी लागेल. यासोबतच SSB मुलाखतीसाठी प्राधान्यक्रमानुसार केंद्राची निवड करावी.
  • एकदा सर्व माहिती भरून झाली की, “Summary of Information” या विभागात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी.
  • सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर “Submit Now” या बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट निघवून सुरक्षित ठेवा, कारण ती भविष्यातील मुलाखत किंवा कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक आहे.

टीप: अर्जात कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास, अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व टप्प्यांवर अचूकता राखणे गरजेचे आहे.

Application Fee

या भरतीच्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Indian Army SSCW Recruitment 2025 Salary by Rank:

RankPay LevelSalary Range (INR)
LieutenantLevel 10₹56,100 – ₹1,77,500
CaptainLevel 10B₹61,300 – ₹1,93,900
MajorLevel 11₹69,400 – ₹2,07,200
Lieutenant ColonelLevel 12A₹1,21,200 – ₹2,12,400
ColonelLevel 13₹1,30,600 – ₹2,15,900
BrigadierLevel 13A₹1,39,600 – ₹2,17,600
Major GeneralLevel 14₹1,44,200 – ₹2,18,200
Lt. General (HAG)Level 15₹1,82,200 – ₹2,24,100
Lt. General (HAG+)Level 16₹2,05,400 – ₹2,24,400
Army Cdr/VCOASLevel 17₹2,25,000 (fixed)
Chief of Army StaffLevel 18₹2,50,000 (fixed)

Additional Benefits

नोकरीदरम्यान उमेदवारांना खालीलप्रमाणे सरकारी सुविधा व भत्ते मिळतील:

  • लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन (Leave Travel Concession) व कॅन्टीन सुविधा (CSD facilities)
  • मिलिटरी सर्व्हिस पे (MSP): ₹15,500 प्रति महिना (लेफ्टनंट ते ब्रिगेडियर पदांकरिता लागू)
  • मोफत निवास सुविधा किंवा त्याऐवजी गृहभाडे भत्ता (HRA)
  • मोफत रेशन, युनिफॉर्म भत्ता, आणि मोफत वैद्यकीय सुविधा (स्वतःसाठी व कुटुंबासाठी)

Selection Process Overview

1. Shortlisting of Applications

  • उमेदवारांचे अभियांत्रिकी पदवीतील एकूण टक्केवारी विचारात घेऊन अर्ज छाननी केली जाते.
  • संघटित मुख्यालय (Integrated HQ of MoD – Army) कडून कट-ऑफ टक्केवारी निश्चित केली जाते.
  • केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच SSB मुलाखतीसाठी ईमेल किंवा SMS द्वारे कॉल लेटर पाठवले जाते.

2. SSB Interview (5 Days)

SSB मुलाखत खालील केंद्रांपैकी एका ठिकाणी घेतली जाते: इलाहाबाद, भोपाळ, बंगळुरू, किंवा कपूरथला

StageDetails
Stage IScreening: Intelligence Test (OIR), Picture Perception & Discussion Test (PPDT)
Stage IIPsychological Tests, Group Testing Officer (GTO) Tasks, Personal Interview

3. Medical Examination

  • SSB ने शिफारस केलेल्या उमेदवारांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते.
  • उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या शारीरिक व वैद्यकीय निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

4. Merit List

  • अंतिम गुणवत्ता यादी SSB कामगिरी आणि वैद्यकीय पात्रता यावर आधारित असते.
  • गुणवत्तेनुसार आणि जागांच्या उपलब्धतेनुसार उमेदवारांना जॉईनिंग लेटर दिले जाते.

5. Training

  • प्रशिक्षण कालावधी: ४९ आठवडे (OTA, चेन्नई येथे)
  • कमिशनिंगच्या वेळी पद: लेफ्टनंट (Lieutenant)
  • प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड: ₹ 56,100/- प्रति महिना
SOME USEFUL IMPORTANT LINKS
Apply Online Link
Click Here
Check Official Notification
Click Here
Official Website
Click Here
Join WhatsApp & Telegram Channel for Govt Job Updates
join Telegram Group
join WhatsApp Group