Free Silai Machine Yojana 2024

Free Silai Machine Yojana 2024| मोफत शिलाई मशीन योजना 2024|अर्ज कसा करावा? शेवटची तारीख ?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Free Silai Machine Yojana 2024:

Free Silai Machine Yojana 2024 या योजनेद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी, मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेचा शुभारंभ केला आहे. गरीब, आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल महिलांना सक्षम तसेच आत्मनिर्भर बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्यामुळे या महिला घरबसल्या शिलाई चे काम करू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतात. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यात 50,000 पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेद्वारे गरीब, आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी ₹15000 चे अनुदान भारत सरकार कडून मिळणार आहे. मोफत शिलाई मशीन योजना 2024 या योजनेद्वारे मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा संपूर्ण लेख वाचा. या योजनेशी संबंधित सर्व माहिती जसे कि; अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता, अर्ज कसा करावा? या लेखामध्ये दिली आहे.

योजनेचे उद्दिष्ट: (Free Silai Machine Yojana)

सरकारद्वारे ही योजना सुरु करण्याचा मुख्य उद्देश भारतातील सर्व गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे. ज्यामुळे या महिला घरबसल्या शिलाई चे काम करू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतात. या योजनेमुळे स्वयं रोजगाराला चालना मिळेल आणि स्रीयांच्या हाताला काम मिळेल. ज्यामुळे त्या आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतात.

या योजने अंतर्गत सर्व महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी ₹ 15,000 चे मानधन सरकारकडून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मोफत प्रशिक्षण आणि सर्टिफिकेट सुद्धा दिले जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट: (Official Website)

मोफत शिलाई मशीन योजना 2024 या योजनेची अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.

Free Silai Machine Yojana 2024: Official Website

योजनेचे फायदे: (Benefits of Free Silai Machine Yojana)

Free Silai Machine Yojana या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत;

  • भारत सरकार ने राबवलेल्या “मोफत शिलाई मशीन योजना” या योजने अंतर्गत भारतातील सर्व गरीब, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.
  • भारतातील प्रत्येक राज्यामध्ये 50,000 पात्र महिलाना या योजनेद्वारे मोफत शिवणयंत्रे दिली जणार आहेत.
  • या योजनेचा लाभ शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना मिळणार आहे.
  • या योजने अंतर्गत महिलांना स्वाभिमानी तसेच आत्मनिर्भर बनवले जाणार आहे.
  • “मोफत शिलाई मशीन योजना “ या योजने अंतर्गत महिलांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
  • या योजने अंतर्गत शिलाई मशीन मिळाल्यामुळे महिला घर बसल्या काम करून स्वतःच रोजगार निर्मिती करू शकतील.

योजनेसाठी लागणारी पात्रता: (Free Silai Machine Yojana: Eligibility Criteria)

केंद्र सरकडून सुरु करण्यात आलेल्या Free Silai Machine Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी, सरकारने ठरवलेल्या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. या अटींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळू शकेल. सरकारने ठरवलेल्या पात्रतेच्या अटी खाली दिल्या आहेत;

  • या योजने अंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्जदार ही महिला आणि भारतीय नागरिक असली पाहिजे.
  • या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 वर्षे या दरम्यान असावे.
  • अर्ज करणाऱ्या महिलेच्या पतीचे मासिक उत्पन्न ₹ 12,000 पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला शिवणकाम किंवा टेलरिंगचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • फक्त गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा फायदा घेता येईल.
  • विशेषतः अपंग आणि विधवा महिलांना या योजनेद्वारे प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • अर्जदाराला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून सामान लाभ मिळालेला नसावा.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for Free Silai Machine Yojana)

पंतप्रधान “मोफत शिलाई मशीन योजना” या योजने मार्फत ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन मिळवायची असेल त्यांना अर्ज करावा लागणार आहे. या योजनेसाठी सर्व महिलांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे सविस्तररित्या खाली दिले आहे.

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.

Free Silai Machine Yojana 2024: Official Website

मोफत शिलाई मशीन योजना 2024
  • वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड इ. वापरून रजिस्ट्रेशन करावे.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करायचे आहे.
  • लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा जसे कि आधार, मोबाइल नंबर, राशन कार्ड, आणि बँक खाते इ.
  • अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती भरा.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर सर्व माहिती तपासून घ्या आणि अर्ज सबमिट करा. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.
  • आता या अर्जाची प्रत जवळच्या CSC केंद्रावर जमा करा.
  • तुमच्या अर्जाची स्तिथी जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन लॉगिन करून पाहू शकता.

या प्रकारे तुम्ही Free Silai Machine Yojana साठी अर्ज कसा करू शकता त्याचप्रमाणे मोफत प्रशिक्षण कसे मिळवू शकता त्याची सर्व माहिती या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे करत आहोत.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for Free Silai Machine Yojana)

जर तुम्हाला Free Silai Machine Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईझ फोटो

Frequently Asked Questions

Q1. Free shilai मशीन मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा?

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता किंवा CSC केंद्राला भेट देऊ शकता.

Q2. Free shilai मशीन या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

  • या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील कागदपत्रे लागतील.
    • आधार कार्ड
    • उत्पन्नाचा दाखल
    • जातीचा दाखला
    • बँक पासबुक
    • पासपोर्ट साईझ फोटो.

Q3. Free shilai मशीन या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी ती व्यक्ती भारताची नागरिक असणे गरजेचे आहे.
  • 20 ते 40 वयोगटातील सर्व महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

Q4. Free shilai मशीन योजना काय आहे?

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now
  • स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top