Budget 2024 in Marathi union budget 2024-25 budget 2024 india budget 2024 tax slab

Budget 2024 in Marathi| तुम्हाला काय फायदा होणार?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Table of Contents

Budget 2024 in Marathi:

23 जुलै 2024 ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget) जाहीर केला. जुलै 2024 चं बजेट, हे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचं पहिलं बजेट आहे. हे यूनियन बजेट जरी असलं तरी काही राज्यांवर जास्त फोकस केलेला दिसत आहे, जसं बिहार आणि आंध्र प्रदेश. बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी 26,000 कोटींचा फंड जाहीर करण्यात आला आहे.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला, budget 2024 india चे फायदे, तोटे, मिळणाऱ्या सवलती या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने वाचता आणि समजून घेता येतील. त्यासाठी हे आर्टिकल पूर्ण वाचा.

Budget 2024 in Marathi 
union budget 2024-25
budget 2024 india
budget 2024 tax slab

union budget 2024-25

कर सुधारणा आणि फायदे: (Tax Reforms and Benefits)

आयकर सवलत

नोकररदार वर्गासाठी मोठी बातमी म्हणजे 7500 रुपयांपर्यंत आयकर मध्ये सेव्हिंग होऊ शकते. हे मध्यम वर्गीय नोकरदारांचे टेक्स चे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे.

EPFO योजना

नोकऱ्यांना चालना देण्यासाठी EPFO अंतर्गत तीन नवीन योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आल्या आहेत:

  1. Freshers Scheme: ज्या लोकांनी/ विद्यार्थ्यांनी कधीच काम केलेलं नाही अशा फ्रेशर्सना सरकार तीन वर्षांपर्यंत दरमहा 15,000 रुपये देईल. हि योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांचा पहिल्या नोकरीचा वर्षभराचा पगार हा 1 लाखाच्या खाली असणार आहे.
  2. Manufacturing Sector Scheme: Manufacturing Sector मध्ये नोकरी करणाऱ्या फ्रेशर्सना पहिल्या दोन वर्षांपर्यंत सरकार 24,000 रुपयांपर्यंत सॅलरी सब्सिडी देणार आहे.
  3. Non-Manufacturing Sector Scheme: Non-Manufacturing Sector मध्ये कर्मचारी वाढवणाऱ्या कंपनी मालकांसाठी 3,000 रुपयांपर्यंत सब्सिडी मिळेल.

रोजगार आणि इंटर्नशिप योजना: (Employment and Internhip Scheme)

इंटर्नशिप योजना

भारतातील तरुणांच्या रोजगार वाढीसाठी, सरकारने 1 कोटी तरुणांसाठी इंटर्नशिप योजना आणली आहे. यामध्ये देशातील टॉप च्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळवण्यासाठी कंपन्यांना 50 लाखांपर्यंतची गुंतवणूक देण्यात आली आहे.
इंटर्नशिप पात्रता: वय 21-24 वर्षे आणि फॅमिली इनकम टॅक्स नसावी.

NPS वत्सल योजना

विद्यार्थ्यांसाठी सरकार 10 लाख रुपयांपर्यंत, शिक्षणासाठी कर्ज देणार आहे. यामध्ये 3% ई- व्हाउचर द्वारे इंटरेस्ट बेनिफिट मिळेल. ह्या स्कीममध्ये गुंतवणूक पर्यायांसाठी फ्लेक्सिबिलिटी आहे. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर हे खाते नियमित NPS अकाउंटमध्ये बदलले जाईल.

जमीन खरेदी/ विक्री मध्ये सुधारणा: (Land Reforms)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्य सरकारांना जमीन खरेदी/ विक्री वरील स्टँप ड्यूटी (मुद्रांक शुल्क) कमी करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. स्टँप ड्यूटी (मुद्रांक शुल्क) कमी केल्यामुळे जमीन नोंदणी वाढतील आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल. ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनींसाठी डिजिटायझेशन योजना देखील आणल्या आहेत.

मौल्यवान धातू आणि अक्षय ऊर्जा: (Precious Metals and Renewable Energy)

union budget 2024-25 मध्ये मौल्यवान धातू आणि अक्षय ऊर्जा यासंबंधित काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंचा दर कमी होणार आहे.

मौल्यवान धातूंवरील सीमाशुल्क

सोने आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्यूटी (सीमाशुल्क) 10% वरून 6% इतकी कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे सोने आणि चांदी च्या किमती कमी होतील.

PM सूर्य घर मोफत वीज योजना

या योजने अंतर्गत पुढील पाच वर्षांत तब्बल 1 कोटी घरांवर सोलर पॅनेल्स लावण्याचं केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी 14 लाख अर्ज आधीच प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे जनतेला मोफत वीज मिळणार आहे.

PM सूर्य घर योजनेचा अर्ज :

PM सूर्य घर योजनेचा अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून भरू शकता.

PM सूर्य घर योजना: Apply here…

शेअर बाजार आणि गुंतवणूक: (Share Market and Invesments)

जर तुम्ही शेअर बाजार (share market today) मध्ये गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्वाची असणार आहे. शेअर बाजार मधील गुंतवणुकीवर लागणाऱ्या कराची मर्यादा आता बदलण्यात आली आहे. या करामध्ये विक्रमी बदल करण्यात आले आहेत.

कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gains Tax)

शॉर्ट- टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 15% वरून 20% करण्यात आला आहे, ज्याचा परिणाम स्विंग ट्रेडर्स आणि शॉर्ट- टर्म इन्व्हेस्टर्सवर होणार आहे. लाँग- टर्म कॅपिटल गेन टॅक्स लिमिट 1 लाख रुपयांवरून 1.25 लाख रुपये करण्यात आली आहे, पण टॅक्स रेट 10% वरून 12.5% करण्यात आला आहे.

शेअर बायबॅक टॅक्सेशन

शेअर बायबॅक आता डिविडंड प्रमाणे टॅक्सेबल असेल, ज्यामुळे इन्व्हेस्टर्सना कॅपिटल लॉस कन्सिडरेशन करावं लागेल. फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील ट्रेडिंग वरील STT देखील वाढवला आहे.

स्टार्टअप्स साठी सपोर्ट: (Start-up Support)

union budget 2024-25 अंतर्गत स्टार्ट अप्सच्या फंडिंग विंटरला मदत करण्यासाठी सरकारने इनव्हॉइस टॅक्स रद्द केला आहे आणि फॉरेन एंटिटीज वरील टॅक्स रेट 40% वरून 35% एवढा करण्यात आला आहे.

अर्थसंकल्प 2024 व्हिडिओ: (Union Budget 2024-25)

union budget 2024-25

नवीन टॅक्स रेजीम: (New Tax Regime)

टॅक्स रेट्स रिविजन्स: (Tax Rates Revision)

आता कर्मचारी वर्गाला नवीन टॅक्स पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. सरकारने नवीन टॅक्स पद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. ज्यामध्ये टॅक्स चे रेट बदलण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गाला मोठा फटका बसणार आहे.

Revised Tax Rates for New Tax Regime: budget 2024 tax slab

खाली तुमचा वार्षिक उत्पन्ना प्रमाणे तुम्हाला नवीन टॅक्स पद्धतीप्रमाणे किती टक्के टॅक्स लागेल हे देण्यात आले आहे.

  • 3 लाख रुपयांपर्यंत नो टॅक्स.
  • 3 लाख ते 7 लाख रुपये: 5% टॅक्स.
  • 7 लाख ते 10 लाख रुपये: 10% टॅक्स.
  • 10 लाख ते 12 लाख रुपये: 15% टॅक्स.
  • 12 लाख ते 15 लाख रुपये: 20% टॅक्स.
  • 15 लाखांपेक्षा जास्त: 30% टॅक्स.

या करामध्ये विशेष अशी सवलत पाहायला मिळत नाही. जुन्या टॅक्स पद्धतीच्या तुलनेत, नवीन टॅक्स पद्धतीमध्ये नोकरदार वर्गाला अधिक कर द्यावा लागणार आहे. ही नोकरदार वर्गासाठी नाराजीची बातमी आहे.

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी standard deduction मध्ये वाढ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टँडर्ड डिडक्शनवर (budget 2024 tax slab) नवीन सवलत जाहीर केली आहे. सध्या मिळणारी सवलत ही 50,000 रुपये होती आता ती बदलण्यात आली असून 75,000 रुपये करण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत कौटुंबिक पेन्शनमधून डिडक्शन वाढवून जे पूर्वी 15,000 रुपये होते ते आता 25,000 रुपये करण्यात आली आहे. आयकर कायदा 80 CCD अंतर्गत पेन्शन योजनेत योगदान दिल्याबद्दल कर्मचाऱ्याने केलेल्या कपातीच्या रकमेत 10% वरून कर्मचाऱ्याच्या पगाराच्या मर्यादेपर्यंत वाढ करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

आरोग्यसेवा आणि विमा: (Healthcare and Insurance)

आरोग्यसेवा महागाई

आरोग्यसेवा महागाई ही 14% आहे, त्यामुळे आपल्याकडे चांगला हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कमी वयात टर्म इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला प्रीमियम कमी राहतो. तुम्हाला ऑनलाईन बरेच इन्शुरन्स कंपनीचे प्लॅन बघता येतील.

वित्तीय तूट आणि महागाई: (Fiscal deficit and inflation)

फिस्कल डेफिसिट टार्गेट 5.1% वरून 4.9% करण्यात आला आहे, जे सकारात्मक आहे. पण हेल्थकेअर इन्फ्लेशन 14% असल्यामुळे हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे.

अर्थसंकल्पाची अधिकृत लिंक: (Official Website for Union Budget 2024)

जर तुम्हाला या अर्थसंकल्पाबद्दल अधिक माहिती वाचायची असेल तर भारत सरकारच्या अर्थसंकल्प 2024 ची अधिकृत वेब्सिते खाली दिली आहे. तिथे तुम्हाला हा संपूर्ण अर्थसंकल्प वाचता येईल.

Union Budget 2024 Government of India: Official Website

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अनेक क्षेत्रांमध्ये फायदे आणि त्याचप्रमाणे आव्हानं घेऊन आला आहे. रोजगार, शिक्षण, लँड रिफॉर्म्स आणि रिन्यूएबल एनर्जी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना हे बजेट आर्थिक वाढीस चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. पण गुंतवणूक दारांसाठी वाढलेले टॅक्स हे एक मोठं आव्हान आहे. आर्थिक वाढ आणि फिस्कल प्रुडन्स यांच्यात संतुलन राखण्याचा हा बजेट प्रयत्न करतोय.

संक्षेपात, अर्थसंकल्प 2024 हा विकास आणि प्रोत्साहन देणारा असा अर्थसंकल्प आहे जो देशाच्या आर्थिक वृद्धीला चालना देत आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top