Atal Pension Yojana 2024 AYP Pension Scheme Pension

Atal Pension Yojana 2024| दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन|अर्ज कसा करायचा?

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest

Table of Contents

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now

Atal Pension Yojana 2024:

अटल पेन्शन योजना 2024 या योजनेची सुरुवात 1 जून 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेमुळे 18 ते 40 वर्षे वयोगटातील युवकांना फायदा मिळणार आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील युवक या योजनेअंतर्गत गुंतवणूक करू शकतात. या सर्व युवकांना या पेन्शन योजने अनुसार ₹ 1000 ते ₹ 5000 पर्यंतची मासिक निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.

Atal Pension Yojana 2024 AYP Pension Scheme Pension

जसजसे आपण लहानाचे मोठे होत जातो तसा आपला दैनंदिन जीवनातील खर्च वाढत जातो. आपला दैनंदिन खर्च भागविण्यासाठी आपला एक नियमित उत्पन्नाचा स्रोत असणे आवश्यक आहे. हे दैनंदिन भागविण्यासाठी पेन्शन योजनेमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. ज्यामुळे निवृत्तीनंतर नियमित मासिक निवृत्तीवेतनाच्या स्वरूपात ही रक्कम परत मिळू शकते.

अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे?:

ही निवृत्तीवेतन योजना भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेली पेन्शन येजना आहे. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम केले जाते. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील युवक कमीत कमी गुंतवणूक करून दरमहा ₹ 1000 ते ₹ 5000 पर्यंतचे निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.

अटल पेन्शन योजना 2024 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट:

या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला वयाच्या 60 वर्षानंतर दर महिन्याला निवृत्तीवेतन मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्धिष्ट आहे. या सर्व कर्मचारी वर्गाला, या योजनेद्वारे दरमहा ₹ 1000, ₹ 2000, ₹ 3000, ₹ 4000, ₹ 5000 (गुंतवणुकी प्रमाणे) पर्यंतच्या निवृत्तीवेतन चा लाभ मिळू शकेल.

अधिकृत वेबसाईट: (Official Website for this Scheme)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक, पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी योजनेची अधीकृत वेबसाईट खाली दिली आहे. या वेबसाईट ला भेट देऊन तुम्ही या योजनेबद्दल अधिक माहिती वाचू शकता.

Atal Pension Yojana 2024: Official Website

योजनेचे फायदे कोणाला मिळतील: (Who will get the Benefit of this Scheme)

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने खाली दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

  • या योजनेचा लाभ घेणारी व्यक्ती ही भारताची नागरीक असावी.
  • ही योजना सर्व बँक खातेधारकांसाठी उपलब्ध आहे.
  • वय वर्षे 18 ते 40 या वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • एकदा सदस्यत्व (Subscription) घेतल्यानंतर गुंतवणूकदाराला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीप्रमाणे प्रतिमहिना ₹ 1000 ते ₹ 5000 दरम्यान निश्चित स्वरूपाचे निवृत्तीवेतन मिळेल.
  • या योजनेअंतर्गत, सदस्यत्व घेणाऱ्याला मासिक निवृत्तीवेतन मिळेल, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला या निवृत्तीवेतन चा लाभ घेता येईल.
  • या किमान निवृत्तीवेतन योजनेची हमी स्वतः भारत सरकारने दिली आहे.
  • ही पेन्शन गुंतवणूकदाराच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.
  • एकदा अटल पेन्शन योजना सुरू केली की ती कधीही बंद केली जाऊ शकते. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी बँक खात्यात पैसे जमा होतील.

योजनेसाठी लागणारी पात्रता: (Eligibility Criteria for this Scheme)

या योजनेसाठी असणाऱ्या पात्रतेच्या अटी खाली दिलेल्या आहेत.

  • या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असावी.
  • वय वर्षे 18 ते 40 या वयोगटातील सर्व नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
  • गुंतवणूक दाराला वयाच्या 42 वर्षांपर्यंत प्रीमियम भरावे लागणार आहे. (या योजनेचे प्रीमियम कमीत कमी: 210₹ तर जास्तीत जास्त: 1400₹ इतके भरावे लागेल.)

योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for this Scheme)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक, पोस्ट ऑफिस किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी लागणारी सर्व माहिती खाली दिली आहे. खाली दिलेल्या स्टेप्स वाचून तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता.

  • सर्वप्रथम, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला या पॅन कार्डच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • पॅन कार्डची अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिली आहे.

Atal Pension Yojana 2024: Online Application

अटल पेन्शन योजना 2024
Atal Pension Yojana 2024
AYP 
Pension Scheme
Pension
  • वरील लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पॅन कार्डच्या अधिकृत वेबसाईट वर पोहोचाल.
  • वेबसाईट ला भेट दिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला 3 स्टेपमध्ये करायचे आहे.
    • New User Registration
    • Complete Pending Registration
    • OTP Authenticate / eSign / Print Registration Form
अटल पेन्शन योजना 2024
AYP
Pension Scheme
penion
  • वरील 3 स्टेप च्या मदतीने तुम्ही या योजनेसाठी तुमचे रजिस्ट्रेशन करु शकता.

योजनेसाठी दरमहा किती हप्ता भरावा लागेल?: (How much Premium Required to Pay for this Scheme)

या योजनेसाठी तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे आणि वयाप्रमाणे तुम्हाला वेगवेगळा हप्ता भरावा लागतो. प्रत्येक वयोमर्यादेप्रमाणे आणि गुंतवणुकीप्रमाणे दरमहा किती हप्ता भरावा लागेल ते खालील तक्त्यामध्ये सविस्तररित्या दिले आहे.

Join Our WhatsApp Group Join Now
Join Our Telegram Group Join Now
Follow us on Instagram Join Now
Age of EntryYears of contributionMonthly Pension of Rs.1000/-Monthly pension of Rs.2000/-Monthly pension of Rs.3000/-Monthly pension of Rs.4000/-Monthly pension of Rs.4000/-
18424284126168210
19414692138180224
204050100150198248
213954108162215269
223859117177234292
233764127192254318
243670139208277346
253576151226301376
263482164246327409
273390178268356446
283297194292388485
2931106212318423529
3030116231347462577
3129126252379504630
3228138276414551689
3327151302453602752
3426165330495659824
3525181362543722902
3624198396594792990
37232184366548701087
38222404807209571196
392126452879210541318
402029158287311641454

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for this Scheme)

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खाली दिली आहेत. अर्ज करताना ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.

  • आधार कार्ड.
  • वयाचा पुरावा.
  • जात प्रमाणपत्र.
  • निवास प्रमाणपत्र (Domicile).
  • मोबाइल नंबर.
  • ई-मेल आयडी.
  • पासपोर्ट साईझ फोटो.

या योजनेतील पैसे कसे काढायचे? (How to Withdraw Money From this Scheme)

अटल पेन्शन योजना या योजनेमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले असतील आणि तुम्हाला ते पैसे काढायचे असतील तर तुमचे पैसे कसे काढायचे ते या खाली सांगितले आहे.

  • 60 वय पूर्ण झाल्यानंतर:
    • जर तुम्हाला 60 वर्षे पूर्ण झाली असतील, तर तुम्ही ज्या बॅंकेअंतर्गत या योजनेचे अकाउंट उघडले आहे त्या बँकेत अर्ज द्यावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला किमान/ कमाल रक्कम पेन्शन च्या स्वरूपात हवी आहे ते बँकेला कळवायचे आहे.
  • 60 वर्षानंतर जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास:
    • जर गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर, पती/ पत्नीला सामान पेन्शन उपलब्ध राहील.
    • जर दोघांचाही मृत्यू झाला तर त्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत जमा केलेली रक्कम नामांकित(nominee) व्यक्तीला मिळेल.
  • वयाच्या 60 वर्षांपूर्वी योजनेतून बाहेर पडल्यास:
    • जर गुंतवणूकदाराने स्वेच्छेने या योजनेमधून बाहेर पडायचे ठरवल्यास, त्याला केवळ या योजनेत गुंतवलेली रक्कम परत केली जाईल.(मेंटेनन्स शुल्क वजा करून उर्वरित रक्कम)
    • सरकारी योगदान, आणि सरकारी योगदानावर कमावलेले उत्पन्न अशा सदस्यांना परत केले जाणार नाही.
  • 60 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्यास:
    • 60 वर्षापूर्वी सदस्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या पती/पत्नीला सदस्याच्या APY खात्यात योगदान सुरू ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असेल जो जोडीदाराच्या नावावर ठेवता येईल, उर्वरित निहित कालावधी पूर्ण होईपर्यंत.
    • सबस्क्राइबरचा पती/पत्नी पती/पत्नीचा मृत्यू होईपर्यंत सदस्याप्रमाणेच पेन्शनची रक्कम मिळवण्याचा हक्कदार असेल किंवा, APY अंतर्गत जमा झालेला संपूर्ण निधी जोडीदार/नॉमिनीला परत केला जाईल.

Frequently Asked Questions

Q1. Atal पेन्शन योजना काय आहे?
  • ही योजना भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेली निवृत्तीवेतन येजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.
Q2. Atal पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
  • या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 18 ते 40 या वयोगटातील कोणतीही व्यक्ती पात्र आहे.
Q3. Atal पेन्शन योजनेत किती वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल?
  • या योजनेमध्ये सदस्य वयाच्या 60 वर्षांपर्यंत दरमहा गुंतवणूक करू शकतो.
Q4. Atal पेन्शन योजनेचे पैसे कधीपासून मिळतील?
  • जेव्हा सदस्यांचे 60 वर्षे वय पूर्ण होईल तेव्हा त्यांना संबंधित बँकेत अर्ज द्यावा लागतो त्यानंतर त्यांच्या खात्यात पेन्शन जमा होण्यास सुरुवात होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
WhatsApp
LinkedIn
Pinterest
Scroll to Top