SBI PO Admit Card download 2025| पूर्व परीक्षेसाठी हॉलटिकिट आता डाउनलोड करा!

SBI PO Admit Card download 2025
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

SBI PO Admit Card download 2025:

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने PO पूर्व परीक्षेचे हॉलटिकिट 2025 अधिकृत वेबसाइटवर (Admit Card Download Link) 25 जुलै 2025 रोजी जाहीर केले आहे. ही परीक्षा 2, 4 आणि 5 ऑगस्ट 2025 रोजी होणार असून, परीक्षेचे हॉलटिकिट आता उपलब्ध झाले आहे. उमेदवारांनी वरती दिलेल्या अधिकृत लिंक वरून आपले SBI PO Admit Card 2025 लवकरात लवकर डाउनलोड करून प्रिंट करून घ्यावे.

हॉलटिकिटमध्ये कोणती माहिती असते?

SBI PO हॉलटिकिटमध्ये उमेदवारासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती दिलेली असते. यामध्ये उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, रोल नंबर, छायाचित्र, परीक्षा दिनांक,परीक्षा शिफ्टची वेळ, रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा केंद्राचा संपूर्ण पत्ता यांचा समावेश आहे. हे सर्व तपशील योग्य असल्याची खात्री परीक्षा देण्यापूर्वी करावी.

also read :  RBI Grade B 2024 Notification Out| RBI Bharti 2024| Salary ₹ 1,22,717 monthly| Apply Now !

SBI PO Admit Card download 2025 कसे डाउनलोड करायचे?

  • SBI PO Admit Card 2025 डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर दिलेल्या ‘Careers’ या विभागावर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला “Probationary Officers Recruitment” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • पुढे दिलेल्या सूचीमधून “Download Preliminary Exam Call Letter” या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन विंडो उघडेल, जिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड (किंवा जन्मतारीख) टाकून लॉगिन करावे लागेल.
SBI PO Exam 2025
SBI PO Exam 2025
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्ही तुमचे हॉलटिकिट डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढावी.

हे सुद्धा वाचा …

Indian Army SSCW Recruitment 2025| 31 Posts Apply Online

SBI PO Admit Card download 2025 डाउनलोड करताना अडचण येतेय?

जर वेबसाइट उघडत नसेल किंवा क्रॅश होत असेल, तर खालील पर्याय वापरून पाहा:

  • जर SBI PO Admit Card 2025 डाउनलोड करताना अडचण येत असेल, तर खाली दिलेल्या माहिती च्या आधारे पुढीलप्रमाणे डाउनलोड करा.
  • सर्वात आधी, खाली दिलेल्या Admit Card डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • यामुळे तुम्ही थेट लॉगिन पेजवर जाल आणि मुख्य पेजवरील ट्रॅफिक टाळता येईल.
  • शक्य असल्यास, रात्री 1 ते 6 वाजेच्या दरम्यान प्रयत्न करा, कारण या वेळेत सर्व्हरवरील लोड तुलनेत कमी असतो.
  • जर पेज लोड होत नसेल, तर तुमच्या ब्राउजरमधील Cache आणि Cookies क्लिअर करा.
  • मोबाईलवर अडचण येत असल्यास, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून प्रयत्न करा.
  • तसेच, Private किंवा Incognito Mode वापरल्याने अनेकदा जुन्या सेव्ह झालेल्या डेटामुळे होणारे अडथळे टाळता येतात आणि लॉगिन प्रक्रियाही अधिक सुरळीत होते.
also read :  Indian Army TGC Recruitment 2024| भारतीय सेनेत पर्मनंट भरती| असा करा अर्ज.

जर यानंतरही SBI PO Admit Card download 2025 मिळत नसेल, तर तुम्ही SBI कडून पुढच्या टप्प्यात कार्ड येण्याची वाट पाहू शकता.

SBI PO Admit Card download 2025 डाउनलोड लिंक:

SBI PO Admit Card download 2025 या लिंक चा वापर करून तुम्हाला admit card download करता येईल .

SBI Support शी संपर्क कधी साधावा?

5 ऑगस्ट 2025 पर्यंत SBI उमेदवारांसाठी सपोर्ट उपलब्ध ठेवणार आहे. त्यामुळे SBI PO Admit Card download 2025 शी संबंधित कोणतीही अडचण असल्यास त्या तारखेपूर्वी SBI हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

SBI PO 2025 परीक्षा केंद्रासाठी गरजेच्या गोष्टी:

परीक्षेला जाताना उमेदवारांनी प्रिंटेड हॉलटिकिट, स्वतःचे फोटो आयडी (आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, नोट्स किंवा अन्य स्टडी मटेरियल नेण्यास बंदी आहे.

SBI PO 2025 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर (Graduation) असणे आवश्यक आहे. पदवी ही भारत सरकारकडून मान्यता प्राप्त असावी.
  • जर तुम्ही सध्या पदवीच्या अंतिम वर्षात किंवा शेवटच्या सेमिस्टरमध्ये असाल, तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. मात्र, मुलाखतीसाठी बोलावल्यास, 30 सप्टेंबर 2025 पूर्वी पदवी परीक्षा पास झाल्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.
  • ज्यांनी इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) पूर्ण केले आहे, त्यांनीही 30.09.2025 पर्यंत पदवी मिळालेली असावी, याची खात्री करावी.
  • तसेच, वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट अशा विशेष प्रकारच्या पदव्या असलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येईल.
also read :  Post Office GDS Recruitment 2024| Notification Out for 44,228 Vacancies| Apply Now

 SBI PO 2025 परीक्षेची माहिती

या भरती प्रक्रियेमार्फत 541 जागा भरण्यात येणार आहेत, त्यात 500 नियमित व 41 बॅकलॉग जागा आहेत. ही परीक्षा तीन टप्प्यात होते, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्व परीक्षेची तारीख 2, 4 आणि 5 ऑगस्ट 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. admit card शिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

वेतन व भत्ते

सध्या, SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी प्रारंभिक मूळ वेतन ₹48,480/- इतके आहे, ज्यामध्ये ४ अ‍ॅडव्हान्स इन्क्रिमेंट्स समाविष्ट आहेत. हा पगार 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920 अशा वेतनश्रेणीनुसार दिला जातो, जी Junior Management Grade Scale-I साठी लागू आहे.

या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला पुढील भत्ते आणि सुविधाही लागू होतील:

  • महागाई भत्ता (DA)
  • घरभाडे भत्ता (HRA)
  • शहर भरपाई भत्ता (CCA)
  • भविष्य निर्वाह निधी (PF)
  • नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)
  • मेडिकल सुविधा
  • एलएफसी (Leave Fare Concession)
  • लीज रेंटल सुविधा
  • आणि इतर भत्ते व विशेष सवलती, ज्या बँकेच्या धोरणानुसार वेळोवेळी लागू केल्या जातात.

मुंबईसारख्या शहरातील नियुक्तीसाठी, या पदाचा एकूण अंदाजित वार्षिक पॅकेज (CTC) सुमारे ₹20.43 लाख इतका आहे.

SOME USEFUL IMPORTANT LINKS
Admit Card Link
Click Here
Check Official Notification
Click Here
Official Website
Click Here
Join WhatsApp & Telegram Channel for Govt Job Updates
join Telegram Group
join WhatsApp Group