Table of Contents
ToggleMaharashtra ST Bus (MSRTC) News Updates
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत येणाऱ्या या बसने सर्व खासगी म्हणजेच ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोराची टक्कर दिली होती. वाहतुकीच्या स्पर्धेत इतर गाड्यांच्या तुलनेत ही बस सर्वांना वरचढ ठरत होती. परंतु अशी कोणती समस्या समोर आली? ज्यामुळे एसटी महामंडळाला ही बस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.
झी २४ तास च्या बातमीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी च्या ताफ्यातील शिवशाही बस बंद करण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. एसटी च्या ताफ्यात शिवशाही बस आल्यापासून तिने जवळजवळ इतर सर्वच प्रतिस्पर्धी खाजगी कंपन्यांना मोठी टक्कर दिली आहे.
त्याचप्रमाणे महामंडळाच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यात देखील मोलाचा वाटा शिवशाही बस चा आहे. परंतु आता हि बस बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवशाही बस चे रूपांतर आता हिरकणी बसमध्ये करण्यात येणार असल्याचे झी २४ तास कडून सांगण्यात आले आहे. शिवशाही चे हिरकणी बस मध्ये रूपांतर झालेली पहिली बस महामंडळाच्या ताफ्यात आली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे सांगितले आहे.
शिवशाही आता प्रवाशांना दिसणार नाही
राज्यातील जवळपास सर्वच शिवशाही बस चे रूपांतर हिरकणी मध्ये करण्यात येणार आहे. हे बदल टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. भविष्यात प्रवाश्यांना शिवशाही बस रस्त्यावरती पाहायला मिळणार नाही. पुण्यातील दापोडी आणि छत्रपती संभाजी नगर मधील चिकलठाणा येथील महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत हे बदल करण्यात येणार आहेत. वातानुकूलित शिवशाही बस आता हिरकणी च्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.
Shivshahi मध्ये हा बदल करण्याचे नेमके कारण काय?
महामंडळाच्या ताफ्यात सध्य स्थितीला ७९२ वातानुकूलित शिवशाही बस आहेत. शिवशाही बस या वातानुकूलित असल्याने त्यांच्या इंजिन वर जास्त भार येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवशाही ही वातानुकूलित बस बंद करून तिचे रूपांतर हिरकणी बस मध्ये करण्यात येणार आहे. असे केल्यामुळे इंजिन वरील भार कमी होईल. या बस च्या रंगसंगतीमध्ये देखील बदल पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आसनात देखील बदल करण्यात येणार असल्याचे समाजत आहे.

Shivshahi चा आठ वर्षांचा इतिहास पुसला जाणार
शिवशाही हि वातानुकूलित बस मुंबई – रत्नागिरी मार्गावर १० जून २०१७ ला एसटी महामंडळाद्वारे सुरु करण्यात आली होती. बघताबघता राज्यातील महत्वाच्या ७५ मार्गांवर शिवशाही बस धावू लागली. या बसला प्रवासी वर्गाचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत होता. या बसमध्ये शयनयान आणि आसन असे दोन्ही पर्याय MSRTC कडून देण्यात आले होते. प्रवाशांना लांब पल्ल्याचा प्रवास वातानुकूलित, आरामदायी तसेच माफक दरात करता यावा हा शिवशाही चालू करण्यामागचा उद्देश होता.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन परिवहन मंत्री व MSRTC चे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बसची सुरुवात करण्यात आली होती. MSRTC आणि खाजगी कंत्राटदारांच्या माध्यमातून ही बस चालवली जात होती. आठ वर्षांच्या या काळात शिवशाहीने प्रवाशांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. दरम्यानच्या कालखंडात काही बसचे अपघातही पाहायला मिळाले. मात्र प्रवाशांची लाडकी असणारी ही शिवशाही बस आता आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रवाशांना रस्त्यावर दिसणार नाही.