PM Kisan 20th Installment: शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 केव्हा जमा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan 20th Installment
Join Our WhatsApp Group Join Now
Join Our WhatsApp Channel Join Now
Join Our Telegram Group Join Now

शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याची प्रतीक्षा – समाधान मिळणार की अजून थांबावं लागेल?

देशभरातील PM Kisan Yojana अंतर्गत लाभार्थी असलेल्या 9.8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना २००० रुपयांच्या PM Kisan 20th Installment ची प्रतीक्षा लागली आहे. शेवटचा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता, आणि जूनच्या अखेरीपर्यंत पुढचा हप्ता येईल अशी अपेक्षा होती. मात्र जुलै अर्धा महिना उलटूनही अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम अद्याप जमा झालेली नाही.

also read :  PM Surya Ghar Yojana 2024 | 300 Units Electricity FREE |PM Suryoday Yojana

१८ जुलै रोजी हप्ता जमा होईल का?

PM Kisan 20th Installment Date या बद्दल अनेक मीडिया रिपोर्ट्सनी अंदाज बांधले आहेत की १८ जुलै २०२५ रोजी बिहारच्या मोतिहारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही घोषणा होऊ शकते. या कार्यक्रमात ₹7100 कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर pm kisan योजना 20वीं किस्त ची तारीख जाहीर केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र, 18 जुलैला अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

PM Kisan 20वी हप्त्याची रक्कम खात्यात कधी येणार?

PM Kisan Yojana 2025 अंतर्गत जर सर्व कागदपत्रे, e-KYC आणि खाते तपशील योग्यरीत्या अपडेट केलेले असतील, तर हप्ता 18 जुलै किंवा त्यानंतरच्या 1-2 दिवसांत थेट बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. सरकारकडून Direct Benefit Transfer (DBT) च्या माध्यमातून ही रक्कम पाठवली जाते.

also read :  शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य

PM Kisan 20th Installment मिळवण्यासाठी आवश्यक महत्त्वाचे टप्पे

जर तुम्हाला वेळेवर ₹2000 मिळवायचे असतील, तर खालील गोष्टींवर लक्ष द्या:

e-KYC पूर्ण करा

जर तुम्ही e-KYC केले नसल्यास तुमची हप्ता रक्कम रोखला जाऊ शकतो. तुम्ही हे pmkisan.gov.in वर जाऊन OTP अथवा CSC सेंटर वर बायोमेट्रिक पद्धतीने करू शकता.

आधार लिंक बँक खाते

तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर रक्कम ट्रान्सफर होणार नाही.

बँक तपशील अचूक असावेत

तुमच्या बँक खात्याचे IFSC कोड, खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव हे सर्व व्यवस्थित अपडेट असणे गरजेचे आहे.

Beneficiary List मध्ये नाव आहे का ते तपासा

जर तुमचं नाव यादीत नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही.

PM Kisan Status कसा तपासायचा?

खालील पायर्यांचा वापर करून तुम्हाला पीएम किसान स्टेटस पाहता येईल.

  1. pmkisan.gov.in वर भेट द्या
  2. “Farmers Corner” मध्ये जा
  3. “Beneficiary Status” वर क्लिक करा
  4. आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका
  5. OTP टाका आणि माहिती पाहा
also read :  Budget 2024 in Marathi| तुम्हाला काय फायदा होणार?

PM Kisan 20th Installment Beneficiary List मध्ये नाव कसं शोधायचं?

  1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
  2. त्यानंतर “Beneficiary List” वर क्लिक करा
  3. आता तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा
  4. त्यानंतर “Get Report” बटण वर क्लिक करा
  5. तुम्हाला एक यादी मिळेल, त्या यादीत तुमचं नाव शोधा.

नवीन अपडेट – Farmer Registry आता अनिवार्य

PM Kisan Yojana साठी आता फक्त नोंदणी पुरेशी नाही, तर Farmer Registry देखील अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्याच्या अधिकृत पोर्टलवर किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज भरावा लागतो.

जर रक्कम अडकली असेल तर तक्रार कुठे करावी?

  • हेल्पलाइन नंबर: 📞 011-23381092
  • ईमेल: 📩 pmkisan-ict@gov.in

PM Kisan 20th Installment साठी कोण पात्र आहे?

PM Kisan Samman Nidhi Yojana साठी पात्रता:

  • शेतजमिनीचे मालक असणारे शेतकरी (2 हेक्टरपर्यंत)
  • जे शेतकरी इनकम टॅक्स भरत नाहीत
  • असे शेतकरी जे शासकीय नोकरी किंवा निवडणूक पदावरील व्यक्ती आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही. ( अर्ज केल्याचे आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल)

PM Kisan 20वी हफ्ता ची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी सरकारकडून तयार्या पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे. जर तुमची e-KYC, बँक तपशील आणि Beneficiary List अपडेट असेल, तर ₹2000 चा हप्ता 18 ते 20 जुलै 2025 दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

  • तुमचं नाव Beneficiary List मध्ये तपासा
  • e-KYC पूर्ण करा
  • बँक डिटेल्स अचूक आहेत याची खात्री करा