Table of Contents
TogglePMEGP Subsidy Scheme 2024:
अश्या व्यक्ती ज्या आपला स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहेत किंवा ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची इच्छा आहे. परंतु पैशांची टंचाई आहे किंवा कर्ज मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असेल. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण आता “PMEGP” ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे ज्यामध्ये व्यवसायासाठी लोन दिले जाणार आहे त्याचप्रमाणे त्या लोन वरती सबसिडी सुद्धा मिळणार आहे.

“PMEGP Subsidy Scheme” म्हणजेच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत नवीन सूक्ष्म उद्योग स्थापन करणाऱ्या उद्योजकांना सरकारद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लाभार्थ्यांच्या श्रेणी आणि स्थानानुसार प्रकल्पाच्या खर्चाच्या 15 ते 35 टक्के पर्यंतचे अनुदान साकारतर्फे मिळणार आहे.
PMEGP योजनेचे उद्दिष्ट: (Objective of PMEGP Subsidy Scheme 2024)
PMEGP हा एक प्रमुख क्रेडिट लिंक सबसिडी कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपारिक कारागीर आणि बेरोजगार तरुणांना मदत करणे हा आहे. बिगर कृषी क्षेत्रात सूक्ष्म उद्योगांची स्थापना करून स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या योजनेचे ठळक उद्दिष्ट आहे.
अधिकृत वेबसाईट: (Official Website)
PMEGP Subsidy Scheme 2024 : Official Website
योजनेचे फायदे: (PMEGP Subsidy Scheme 2024 Benefits)
ज्या व्यक्तींना आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे किंवा ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय वाढवायची इच्छा आहे. परंतु पैशांची टंचाई आहे किंवा कर्ज मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असेल. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण आता “PMEGP” ही योजना केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येत आहे ज्यामध्ये व्यवसायासाठी लोन दिले जाणार आहे त्याचप्रमाणे त्या कर्जावरती अनुदान सुद्धा मिळणार आहे.
PMEGP Subsidy Scheme 2024 या योजनेचे फायदे खालील प्रमाणे आहेत;
- या योजनेच्या माध्यमातून लहान, सूक्ष्म आणि मध्यवर्गीय व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
- या योजनेअंतर्गत उद्योजकांना 2 लाख ते 10 लाख पर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावर, ग्रामीण भागामध्ये 35 टक्के आणि शहरी भागात 25 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
- या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जावर नियमाप्रमाणे सबसिडी दिली जाईल, जी वेगवेगळ्या श्रेणीतील लोकांसाठी वेगवेगळी असणार आहे.
- या योजनेचे लाभार्थी देशातील ते सर्व तरुण असतील ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
हे सुद्धा वाचा…
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
Atal Pension Yojana 2024 | दरमहा मिळणार ₹ 5,000 पेन्शन, जाणून घ्या, अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी लागणारी पात्रता: (PMEGP Subsidy Scheme 2024: Eligibility Criteria)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली काही महत्त्वाचे पात्रता निकष दिलेले आहेत;
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय हे अठरा वर्षांपेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे.
- ज्या व्यक्तींना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा व्यक्ती या योजनेद्वारे मिळणाऱ्या कर्जाचा फायदा करून घेऊ शकतात.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कोणतीही उत्पन्न मर्यादा नसणार आहे.
- उत्पादन क्षेत्रात दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त आणि व्यवसायिक क्षेत्रात पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त खर्चाचा प्रकल्प उभारण्यासाठी, लाभार्थींची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता आठवी उत्तीर्ण ही असणार आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य केवळ PMEGP अंतर्गत विशेषतः मंजूर केलेल्या नवीन प्रकल्पांसाठी उपलब्ध असेल.
- ज्यांनी अद्ययावत असलेल्या (PMRY, REGP या भारत सरकारच्या किंवा इतर राज्यांच्या कोणत्याही योजनेअंतर्गत) आणि ते ज्यांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत सकाळी अनुदानाचा लाभ घेतला आहे ते या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.
- भांडवली खर्च नसलेले प्रकल्प या योजनेअंतर्गत वित्तपरवठा मिळवण्यासाठी अपात्र आहेत.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाच्या पैशातून व्यवसायासाठी लागणारी जमीन खरेदी करता येणार नाही.
- अर्जदार जर प्रदीर्घ कालावधीसाठी व्यवसाय करण्यासाठीची जमीन किंवा शेड भाडेतत्त्वावर घेत असेल तर हा खर्च या योजनेअंतर्गत ग्राह्य धरला जाणार आहे. हा खर्च जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत मोजला गेलेल्या प्रकल्प खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?: (How to Apply for PMEGP Subsidy Scheme 2024)
जर तुम्ही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असाल किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा घ्यायचे असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारकडून कर्ज मिळणार आहे त्याचप्रमाणे 25 टक्के ते 35 टक्के पर्यंतचे अनुदानही मिळणार आहे.
या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.
PMEGP Subsidy Scheme 2024 : Official Website
- अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर, तुम्हाला PMEGP असे लिहिलेले दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

- क्लिक केल्यानंतर तुम्हाला Application for New Unit असे लिहिलेले पाहायला मिळेल.
- आता तुम्हाला Apply या बटणावरती क्लिक करायचे आहे.

- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज दिसेल.
- तुम्हाला काळजीपूर्वक सर्व माहिती भरायचे आहे, आणि लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे: (Documents Required for PMEGP Subsidy Scheme 2024)
या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
- Aadhar card
- Cast Certificate ( SC, ST, OBC, General etc.)
- Bank Passbook
- Project Report Summary (Related to Business)
वाचकांना निवेदन आहे की या ब्लॉग मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे हा ब्लॉग संपूर्ण वाचावा. ब्लॉग आवडल्यास कमेन्ट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सुद्धा हा ब्लॉग शेअर करा…
अनुदान: (Subsidy)
शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान (Subsidy) संबंधित सविस्तर माहिती खाली दिली आहे.
नवीन उद्योगांच्या स्थापनेकरता:
नवीन उद्योगांच्या स्थापनेकरता शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान संदर्भातील माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
PMEGP अंतर्गत लाभार्थ्यांची श्रेणी | लाभार्थींचे योगदान (एकूण प्रकल्प खर्चाच्या) | अनुदानाचा दर (एकूण प्रकल्प खर्चाच्या) | |
---|---|---|---|
क्षेत्र (व्यवसायाचे ठिकाण) | शहरी | ग्रामीण | |
सर्वसाधारण | 10% | 15% | 25% |
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक, महिला. माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, भिन्न ईशान्य प्रदेश, महत्वाकांक्षी जिल्हे, डोंगराळ आणि सीमावर्ती भाग (सरकारने अधिसूचित केल्यानुसार) | 5% | 25% | 35% |
चालू PMEGP, REGP, मुद्रा योजनेच्या अपग्रेडेशन करता:
चालू PMEGP, REGP, मुद्रा योजनेच्या अपग्रेडेशन करता शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान संदर्भातील माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
PMEGP अंतर्गत लाभार्थ्यांची श्रेणी | लाभार्थींचे योगदान (एकूण प्रकल्प खर्चाच्या) | अनुदानाचा दर (एकूण प्रकल्प खर्चाच्या) |
---|---|---|
सर्व श्रेणी | 10% | 15% (NER आणि डोंगराळ राज्यांमध्ये 20%) |
अधिकृत संपर्क केंद्र: (Official Contact)
जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल किंवा अर्ज करताना काही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या PMEGP Subsidy Scheme 2024 च्या संपर्क केंद्राशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारु शकता.
- State Director, KVIC
- Address available at- http://www.kviconline.gov.in
- Dy. CEO (PMEGP), KVIC, Mumbai
- Ph: 022-26711017
- Email: ykbaramatikar.kvic@gov.in
Frequently Asked Questions
Q1. What is the full form of PMEGP Scheme?
- PMEGP – Prime Minister Employment Generation Programme
Q2. What are the age criteria for PMEGP Scheme?
- Minimum age required to apply for PMEGP Scheme is 18.
Q3. What are the benefits of PMEGP Scheme?
- This scheme provides low interest rates loan and subsidy to new or young entrepreneurs.
- Under this scheme entrepreneurs will have to invest 10% of the total project cost for general category, and 5% of the total project cost for reserved category.