Table of Contents
ToggleUPSC Recruitment 2024:
Union Public Service Commission अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असल्याचे अधिकृत वेबसाईट वर जाहीर केले आहे. या जाहिरातीमध्ये सांगितल्या प्रमाणे Specialist Grade III Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक), Scientist ‘B’ (शास्त्रज्ञ ‘B’), Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) या पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती अंतर्गत “संघ लोकसेवा आयोग” मार्फत एकूण 109 रिक्त जागांसाठी ही पदभरती होणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 2 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखामध्ये या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे ज्यामध्ये पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा त्याचप्रमाणे भरतीचा अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टी वाचायला मिळतील.
Organization | Union Public Service Commission (UPSC) |
---|---|
Post | Multiple |
Vacancies | 109 |
Application starts Date | 13 April 2024 |
Last Date | 02 May 2024 |
Age limit | As per post |
Education Qualification | As per post |
Form Fee | ₹ 25/- only |
Official Website | Union Public Service Commission (UPSC) |
अधिकृत जाहिरात: (UPSC Recruitment 2024 Notification)
UPSC ने 109 रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात काढली आहे. या भरतीच्या अधिकृत जाहिरातीची लिंक खाली दिली आहे. त्या लिंक वर जाऊन तुम्ही अधिकृत जाहिरात पाहू शकता.
UPSC Recruitment 2024: Official Notification
अर्जाची लिंक: (UPSC Recruitment 2024 Application link)
या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिली आहे.
UPSC Recruitment 2024: Apply here…
महत्वाचे दिनांक: (Important Dates for UPSC Recruitment 2024)
तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी खाली दिलेल्या तारखा खूप महत्वाच्या आहेत.
घटना | दिनांक |
---|---|
अर्ज करण्यास सुरुवात | 13 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 2 मे 2024 |
अर्ज कसा करायचा?: (How to Apply for UPSC Recruitment 2024)
जर तुम्हाला सुद्धा या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील steps चा वापर करायचा आहे.
- हा अर्ज दोन टप्प्यात करायचा आहे:
- Step 1: One Time Registration
- Step 2: Application for Post
Step 1: One Time registration
- सर्वप्रथम तुम्हाला आयोगाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यायची आहे. अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे.
UPSC Recruitment 2024: Apply here…

- अधिकृत वेबसाईट ला भेट दिल्यानंतर One Time Registration वर क्लिक करायचे आहे.
- आता रजिस्ट्रेशन चे पेज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरून अकाउंट बनवायचा आहे.
- अकाउंट बनवला कि त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या ई-मेल वरती येईल.

Step 2: Apply for Post
- आता पुन्हा तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर जायचे आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.

- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे त्याचप्रमाणे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडायचे.
- त्यानंतर लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करायची आणि preview च्या माध्यमातून भरलेली माहिती तपासून घ्यायची.
- माहिती तपासून झाल्यावर परीक्षा शुल्क भरायचे आहेत.
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी तुम्ही SBI चलन चा वापर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने भरायचे झाल्यास इंटरनेट बँकिंग, UPI, क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांचा वापर करू शकता.
- फी भरून झाली कि अर्ज सबमिट करायचा आहे आणि डाउनलोड करायचा आहे.
NOTE: सर्व उमेदवारांनी कोणत्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी “संघ लोकसेवा आयोग” च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन त्यांची अधिकृत जाहिरात वाचावी.
Application Fees for UPSC Recruitment 2024:
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
- Gen/ OBC/ EWS/ पुरुष उमेदवार: ₹ 25/-
- SC/ ST/ Female/ PwBD: No Fee
एकूण रिक्त पदे: (Total Vacancies)
ही भरती 109 रिक्त पदांसाठी होणार आहे. पदानुसार रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत.
Post Name | Vacancies |
---|---|
Scientist ‘B’ (Non-Destructive) | 2 |
Specialist Grade III Assistant Professor (Nephrology) | 8 |
Specialist Grade III Assistant Professor (Nuclear Medicine) | 3 |
Specialist Grade III Assistant Professor (Orthopaedics) | 10 |
Specialist Grade III Assistant Professor (Paediatric Cardiology) | 1 |
Specialist Grade III Assistant Professor (Paediatric Surgery) | 9 |
Specialist Grade III Assistant Professor (Plastic and Reconstructive Surgery) | 3 |
Specialist Grade III Assistant Professor (Surgical Oncology) | 2 |
Specialist Grade III Assistant Professor (Urology) | 4 |
Research Officer (Chemistry) | 1 |
Scientist ‘B’ (Chemistry) | 1 |
Scientist ‘B’ (Physics) | 1 |
Investigator Grade-I | 2 |
Assistant Chemist | 3 |
Nautical Surveyor-cum-Deputy Director General (Technical) | 6 |
Assistant Professor (BBA) | 1 |
Assistant Professor (Commerce General) | 2 |
Assistant Professor (Corporate Secretaryship) | 2 |
Assistant Professor (Economics) | 2 |
Assistant Professor (English) | 2 |
Assistant Professor (Hindi) | 1 |
Assistant Professor (Music) | 1 |
Assistant Professor (Psychology) | 1 |
Assistant Professor (Sociology) | 1 |
Medical Officer (Ayurveda) | 40 |
Total | 109 |
हे सुद्धा वाचा …
- ₹8.30 लाखात लॉन्च झाली Nissan Magnite ची नवीन Black Edition, जाणून घ्या फीचर्स, इंजिन व मायलेज
- FYJC Admission 2025: राज्यात १२ लाख जागा अजून रिक्त, ‘ओपन टू ऑल’ फेरी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी!
- भारताने थांबवली रशियन तेल खरेदी| ट्रम्प यांच्या US Tariff चा दबाव?
- शेतकऱ्यांची कर्जमाफी: कृषिमंत्री दत्ता भरणेंचं मोठं वक्तव्य
- Vivo V60 5G येतोय नवा डिझाईन आणि ताकदवान प्रोसेसरसह, किंमत किती? जाणून घ्या सविस्तर!
RPF Recruitment 2024| Constable and SI Recruitment| रेल्वे संरक्षण दल भरती
शैक्षणिक पात्रता: (Education Qualification Required for UPSC Recruitment 2024)
या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
Post | Education |
---|---|
Investigator Grade-I | Post Graduate Degree in relevant subject with 3 years of work experience. |
Scientist ‘B’ | Master’s Degree or B.E/B. Tech in relevant discipline with 2 & 3 years of practical experience. |
Medical Officer | A degree in Ayurveda |
Specialist Grade III Assistant Professor | MBBS / PG Degree in Concerned Specialty with 3 years of work experience. |
Research Officer | Master’s Degree in Organic Chemistry with 3 years of work experience. |
वयोमर्यादा : (Age limit)
या भरतीची पदानुसार वयोमर्यादा खाली दिली आहे. खालील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी उच्च वयोमर्यादेची यादी दिली आहे. जर उमेदवार वयोमर्यादा पूर्ण करत असतील तरच ते पात्र असतील. सरकारी नियमांनुसार वयाची सवलत लागू आहे.
Post | Age Limit |
---|---|
Investigator Grade-I | 30 years |
Specialist Grade III | 40 years |
Scientist ‘B’ | 35 / 40 years |
Assistant Chemist | 30 years |
Assistant Professor | 35 years |
Nautical Surveyor-cum Deputy Director General | 50 years |
Medical Officer | 35 years |
Research Officer | 30 years |
Category wise Age Relaxation
जर तुम्हाला आरक्षण लागू होत असेल तर सरकारी नियमांनुसार या भरतीसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
निवड प्रक्रिया: (Selection Process)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
परीक्षेचा नमुना: (Exam Pattern)
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही.या भरतीची निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.
वेतन: (Salary)
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार खालीलप्रमाणे वेतन मिळणार आहे.
Post | Pay Scale |
---|---|
Investigator Grade-I | ₹ 44900 – 142400 |
Specialist Grade III Assistant Professor | ₹ 67700 – 208700 |
Scientist ‘B’ | ₹ 56100 – 177500 |
Assistant Chemist | ₹ 44900 – 142400 |
Assistant Professor | ₹ 57700 – 182400 |
Nautical Surveyor-cum Deputy Director General | ₹ 78800 – 209200 |
Medical Officer | Level-10 |
Research Officer | ₹ 47600 – 151100 |